बिल्कीस बानो यांची पुनर्विलोकन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

Bilquis Bano's review petition was dismissed by the Supreme Court

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने बिल्किस बानो यांची पुनर्विचार याचिका फेटाळली आहे. याचिकेत बिल्किस बानो यांनी गुजरात सरकारच्या 1992 तुरुंगाच्या नियमांनुसार 11 दोषींना सोडण्याची परवानगी देणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान दिले होते.

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अजय रस्तोगी आणि न्यायमूर्ती विक्रम नाथ यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणारी बिल्किस बानो यांची याचिका फेटाळण्यात येत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

याआधीही सर्वोच्च न्यायालयाने बिल्किस बानोच्या याचिकेवर सुनावणी करण्यास नकार दिला होता. त्या याचिकेत त्यांनी 11 दोषींच्या शिक्षेमध्ये बदल करण्याच्या याचिकेवर सुनावणी करण्यासाठी तातडीने खंडपीठ स्थापन करण्याची मागणी केली होती.

Crime News : मित्रासोबत फिरायला आलेल्या तरुणीला पोलिसाने धमकावून निर्जनस्थळी नेले आणि ..

 

तसेच बिल्किस बानो प्रकरणातील आरोपींच्या सुटकेविरोधात सीपीएम नेत्या सुभाषिनी अली, पत्रकार रेवती लाल, तृणूस काँग्रेस खासदार महुआ मोईत्रा, माजी आयपीएस अधिकारी मीरा चढ्ढा बोरवणकर, नॅशनल फेडरेशन ऑफ इंडियन वुमन आदींनी याचिका दाखल केल्या होत्या.

दोषींची चांगली वागणूक आणि त्यांची शिक्षा 14 वर्षे पूर्ण झाल्यामुळे केंद्र सरकारच्या मंजुरीनंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे गुजरात सरकारने न्यायालयाला सांगितले होते.

हे देखील वाचा