Cashback SBI Card : जर तुम्ही ऑनलाइन शॉपिंग करत असाल तर मोठी संधी आहे. याद्वारे तुम्ही प्रत्येक खरेदीवर बचत करू शकाल. SBI कार्डने ही ऑफर सुरू केली आहे. यासाठी कंपनीने कॅशबॅक क्रेडिट कार्ड (Cashback SBI Credit Card) लॉन्च केले आहे.
यामध्ये कार्डधारकांना सर्व ऑनलाइन खरेदीवर 5% कॅशबॅक मिळू शकतो. कॅशबॅक एसबीआय कार्ड हे कॉन्टैक्टलेस कार्ड आहे. पहिल्या वर्षी मार्च 2023 पर्यंत हे मोफत दिले जात आहे.
SBI कार्डनुसार, कॅशबॅक SBI कार्ड ग्राहकांना कोणत्याही मर्यादेशिवाय सर्व खर्चावर 1 टक्के कॅशबॅक मिळेल. 10,000 रुपयांपर्यंत खरेदी केल्यास हा कॅशबॅक 5% पर्यंत वाढेल.
सर्वात चांगली गोष्ट म्हणजे खरेदीवर कोणतेही बंधन नाही. ही ऑफर सर्व व्यापाऱ्यांकडील खरेदीवर लागू होईल. यात ऑटो क्रेडिटसह कॅशबॅक सुविधेचा पर्याय आहे. यामुळे तुम्हाला दोन दिवसांत कॅशबॅक मिळेल.
काय आहेत शुल्क?
कार्डच्या नूतनीकरणासाठी वार्षिक नूतनीकरण शुल्क लागू होईल. ते 999 रुपये अधिक कर असेल. तुम्ही कार्ड सदस्यत्व घेतल्याच्या वर्षभरात 2 लाख रुपयांपर्यंतची वार्षिक खरेदी केल्यास वार्षिक नूतनीकरण शुल्क परत केले जाईल. SBI कार्ड व्हिसा प्लॅटफॉर्मवर कॅशबॅक उपलब्ध आहे.
वैशिष्ट्ये काय आहेत?
1. कॅशबॅक
– प्रत्येक ऑनलाइन खरेदीवर 5% कॅशबॅक. व्यापारी निर्बंध नाहीत.
– सर्व खर्च आणि युटिलिटी पेमेंटवर अमर्यादित 1% कॅशबॅक
– कॅशबॅकची रक्कम दोन दिवसात खात्यात परत केली जाईल
2. ज्वाइनिंग आणि रिन्यूअल फीस
– मार्च 2023 पर्यंत विशेष ऑफर अंतर्गत पहिल्या वर्षासाठी कार्ड सदस्यत्व विनामूल्य
– कार्ड सदस्यत्व वर्षात रु.2 लाख किंवा त्याहून अधिकच्या खरेदीवर रु.999 च्या वार्षिक शुल्काचा परतावा
3. फ्यूल सरचार्ज
– 1% इंधन अधिभार माफी (रु. 500 ते रु. 3000 मधील व्यवहारांवर लागू).
4. एयरपोर्ट लाउंज एक्सेस
– एका वर्षात 4 मोफत देशांतर्गत विमानतळ लाउंज भेटी (प्रति तिमाही जास्तीत जास्त 1 भेट)