मध्य प्रदेश, ग्वाल्हेर : आपण अनेकदा पाहतो की, प्रेमाला वयाचे, जाती-धर्माचे कशाचे ही बंधन नसते. अनेकदा आपण पाहिले आहे की, नाती, वय, जात-धर्म सोडून एकमेकांवर प्रेम (Love Story) करतात आणि आनंदाने राहतात.
प्रेमाचं एक असंच अनोखं उदाहरण समोर आले आहे. मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) ग्वाल्हेर (Gwalior Love Story) जिल्ह्यातील ६७ वर्षीय महिला रामकली एका २८ वर्षीय भोलू नावाच्या तरूणाच्या प्रेमात पडली. आता दोघांना एकत्र राहण्यासाठी कोर्टाकडे मदतीची मागणी केली आहे.
३९ वर्षांचं आहे दोघात अंतर
रामकली आणि भोलू यांनी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये रहायचे आहे आणि पुढील आयुष्य सोबत जगायचे आहे. यासाठी त्यांनी ग्वाल्हेरच्या एका कोर्टात अर्ज दाखल केला आहे.
रामकली आणि भोलू म्हणाले की, दोघेही एकमेकांवर खूप प्रेम करतात. ते गेल्या सहा वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत आहे आणि पुढेही त्यांना तसंच रहायचं आहे.
लिव्ह इन रिलेशनशिप दरम्यान भविष्यात कोणताही वाद होऊ नये आणि त्यांचं आधीपेक्षा जास्त मजबूत व्हावे म्हणून त्यांनी कोर्टाकडे अर्ज केला आहे.
वकिल काय म्हणाले?
वकिल दिलीप अवस्थी म्हणाले की, कपल मुरैना जिल्ह्यातील कॅलारसचे राहणारे आहे. ६७ वर्षीय रामकली आणि २८ वर्षीय भोलू एकमेकांवर प्रेम करतात आणि दोघांना सोबत रहायचे आहे पण लग्न करायचे नाही.
लिव्ह इनमध्ये राहत असताना त्यांच्यात काही वाद होऊ नये त्यासाठी त्यांनी नोटरी तयार केली आहे. हा अर्ज त्यांनी कोर्टासमोर सादर केला आहे.
दिलीप अवस्थी म्हणाले की, वाद वाचवण्यासाठी कपलने लिव्ह इन रिलेशनशिपची नोटरी तयार केली आहे. कायदेशीर या कागदाला तसे काही महत्व नाही.
हा मुद्दा हिंदू विवाह श्रेणीत येत नाही. असो, अशात ६७ वर्षीय रामकली आणि २८ वर्षीय भोलू यांची प्रेम कहाणी सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.