शेतकऱ्यांसाठी खूशखबर : PM Kisan e-KYC करण्यासाठी मुदत वाढवली

PM Kisan Yojana

PM Kisan e-KYC: पीएम किसान सन्मान निधी योजनेशी संबंधित १२.५३ कोटी शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. शेतकऱ्यांना ई केवायसी करण्यासाठी ३१ मार्च ही तारीख दिली होती.

पण काही शेतकरी वेळेवर ई-केवायसी करू शकले नाहीत. त्यामुळे त्यांना अडचण निर्माण झाली होती.

त्यामुळे आता या शेतकऱ्यांना ई-केवायसी करण्यासाठी ३१ मे पर्यंत वेळ वाढवून देण्यात आली आहे.

त्यामुळे त्यांना दोन हजार रूपयांचा शेवटचा हप्ता त्यांना भरता येणार आहे.

अशाप्रकारे पूर्ण करा ई- केवायसी

स्टेप १ – मोबाईलवरून गुगल क्रोमवर जाऊन pmkisan.gov.in टाईप करा.

त्यानंतर तुम्ही पीएम किसान पोर्टलच्या होमपेजवर जाल.

तिथे तुम्हाला e-KYC असे लिहिलेले दिसेल. तिथे क्लिक करून तुम्ही तुमचा आधार क्रमांक टाकून सर्च बटण दाबा.

स्टेप २- नंतर आधारला लिंक असलेला मोबाईल नंबर टाका.

त्यानंतर मोबाईलवर चार अंकी ओटीपी येईल. तो टाका.

स्टेप ३- त्यानंतर ऑथेंटिफिकेशनसाठी बटन दाबा. त्यानंतर पुन्हा ६ अंकी ओटीपी येईल. तो भरून सबमिट बटण दाबा.

पूर्ण प्रक्रिया योग्य प्रकारे केली तर e-KYC पूर्ण होईल. नाहीतर Invalid असा पर्याय दिसेल.

यामुळे एप्रिलमध्ये येणारा तुमचा हप्त्यावर परिणाम होऊ शकतो.

त्यामुळे आधार सेवा केंद्रावर जा आणि ते दुरुस्त करून घ्या.

पीएम किसान योजनेअंतर्गत, मोदी सरकार प्रत्येक आर्थिक वर्षात शेतकऱ्यांना ६००० रुपये देते.

ते ३ हप्त्यांमध्ये दिले जाते. या वर्षाचा शेवटचा हप्ता १ एप्रिल नंतर येणार आहे.