Agniveers Banking Recruitment: अग्निवीरांची बँकिंग भर्ती भारतीय लष्कराने 11 बँकांशी अग्निवीरांच्या नोंदणीनंतर त्यांना बँकिंग सुविधा देण्यासाठी सामंजस्य करार केला आहे. संरक्षण मंत्रालयाने शनिवारी ही माहिती दिली. यावर्षी जूनमध्ये सरकारने तिन्ही दलाच्या सेवांसाठी ‘अग्निपथ’ योजना जाहीर केली होती.
काय बदलले ते जाणून घ्या
या योजनेंतर्गत, 17 ते 21 वर्षे वयोगटातील तरुणांना केवळ चार वर्षांसाठी सैन्यात भरती केले जाईल, त्यापैकी 25 टक्के नियमित सेवेसाठी निवडले जातील.
2022 साठी उच्च वयोमर्यादा 23 वर्षे करण्यात आली आहे. या तिन्ही सेवा सध्या नव्या योजनेअंतर्गत भरती प्रक्रिया सुरू करत आहेत. ‘अग्निवीर’ची पहिली तुकडी पुढील वर्षी जानेवारीपर्यंत लष्कराच्या प्रशिक्षण केंद्रांमध्ये रुजू होईल.
कोणत्या बँकांचा समावेश
मंत्रालयाने म्हटले आहे की, भारतीय लष्कराने स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बडोदा, आयडीबीआय बँक, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, एक्सिस बँक, येस बँक, कोटक महिंद्रा यांना नोंदणीनंतर ‘अग्निवीर’ यांना बँकिंग सुविधा देण्यासाठी करार केले आहेत. बँकेने IDFC फर्स्ट बँक आणि बंधन बँक यासारख्या 11 बँकांशी ऐतिहासिक सामंजस्य करार केले आहेत.