Wife Swap : 5 स्टार हाॅटेलमध्ये चालायचा बायको अदलाबदलीचा खेळ, नकार देणाऱ्या महिलेसोबत नेमके काय घडले?

0
50

Rajasthan News: राजस्थानमधील बिकानेरमध्ये जबरदस्तीने पत्नीची अदलाबदल केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

वाईफ स्वॅपिंग गेममध्ये सहभागी होण्यास नकार दिल्याने एका महिलेने आपल्या पतीवर क्रूरतेचा आरोप केला आहे.

या प्रकरणाचा तपास करणार्‍या अधिकार्‍यांनी असेही सांगितले की या धक्कादायक घटनेत पीडित महिलेने ‘वाईफ स्वॅप’ गेममध्ये सहभागी होण्यास नकार दिला.

त्यामुळे संतापलेल्या पतीने तिला अमानुष्य पध्दतीने मारहाण केली. राजस्थानमधील बिकानेर येथील हॉटेलच्या खोलीत ही घटना घडली आहे.

बिकानेरच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये हिंसाचार

रिपोर्ट्सनुसार, महिलेने हॉटेल मॅनेजर पती मोहम्मद अम्मरवर आरोप केले आहेत. पोलिस तक्रारीनुसार, पीडितेने सांगितले की, आरोपी अम्मार (पती) याने तिला हॉटेलच्या खोलीत बंद केले आणि तिचा फोन हिसकावून घेतला. दोन दिवसांनी तो मद्यधुंद अवस्थेत तेथे हाॅटेलच्या रुममध्ये पोहोचला.

त्यानंतर त्याने ड्रग्जच्या नशेत तिच्यासोबत बळजबरीने सेक्स केला. वेगवेगळ्या मुलींशी आणि अगदी मुलांसोबत लैंगिक संबंध ठेवणे हे त्याच्यासाठी नेहमीचेच होते. तिच्या पतीने तिला बायको स्वॅप करायला सांगितले.

बायकोला जनावरांपेक्षा वाईट वागणूक दिली

फिर्यादीत म्हटले आहे की, जेव्हा मी गेमचा भाग होण्यास नकार दिला तेव्हा त्याने मला अमानुष मारहाण केली, मला असभ्य भाषेत शिव्या दिल्या आणि माझ्यासोबत अनैसर्गिक लैंगिक संबंध ठेवले.

पीडितेने पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला

पोलिस तक्रारीनुसार, तिने असेही सांगितले की, सासू, तिची नणंद आणि पतीने 50 लाख रुपयांच्या हुंड्याची मागणी केली.

तिने हे देखील सांगितले तरी तिच्या माहेरच्या लोकांनी कधीही तिच्या तक्रारीकडे लक्ष दिले नाही आणि तिच्यावर “माॅर्डन” नसल्याचा आरोप केला.

जखमी झाल्यानंतरही अनेक महिने मारहाण सुरूच राहिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. नंतर तिला तिच्या नातेवाईकांनी तिच्या माहेरी नेले आणि नंतर तिने तक्रार दाखल केली.