Agniveer Recruitment: वायुसेनेमध्ये अग्निवीर भरतीसाठी अर्ज सुरू, 25 ऑक्टोबरपर्यंत ऑफलाइन अर्ज करा !

Agniveer Recruitment in Air Force

Agniveer Recruitment: सेंट्रल एअर कमांड आणि एअर फोर्स स्टेशन बमरौली येथे अग्निवीरांची भरती होणार आहे. यासाठी ऑफलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत.

अर्ज सादर करण्यासाठी केवळ 9 दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. भरलेला फॉर्म पोस्टाद्वारे किंवा थेट 25 ऑक्टोबरपर्यंत सबमिट केला जाऊ शकतील.

या पदांसाठी भरती होणार 

स्वयंपाकी, मेस वेटर, सफाईवाला, पाणी वाहक, नाई, वॉशरमन, मोची, शिंपी, चौकीदार आदींची अग्निवीर योजनेतून हवाई दलात भरती करण्यात येणार आहे.

या पदांसाठी भरतीसाठी रविवारी सेंट्रल एअर कमांड हेडक्वार्टर आणि एअर फोर्स स्टेशन बमरौली येथून जाहिरात जारी करण्यात आली आहे.

Vaishali Takkar Tragic Love Story: वैशालीचे आयुष्य उद्ध्वस्त करणारा राहुल, स्वतः जगत होता वैवाहिक जीवन, असे तुटले नाते

देशभरात विविध ठिकाणी झालेल्या अग्निवीर भरतीसाठी ऑनलाइन अर्ज घेण्यात आले असून फॉर्म भरण्यासाठी सुमारे एक महिन्याचा कालावधी देण्यात आला होता.

मात्र या भरतीसाठी ऑफलाइन अर्ज मागविण्यात आले असून 9 दिवसांत फॉर्म भरण्याची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.

या भरतीसाठी 18 ते 23 वर्षे वयोगटातील उच्च माध्यमिक उत्तीर्ण झालेले तरुण अर्ज करू शकतात. अर्ज करणाऱ्या उमेदवाराची उंची 152.5 सेमी असावी. उमेदवारांना सेंट्रल एअर कमांड हेडक्वार्टर आणि एअर फोर्स स्टेशनवर स्वतंत्रपणे अर्ज करावा लागेल.

निवड अशी होईल

अर्ज केलेल्या उमेदवारांची इंग्रजी (English) आणि सामान्य ज्ञानात (General Knowledge) 20 गुणांची लेखी परीक्षा होईल.

त्यात पात्र ठरलेल्यांना 30 गुणांची प्रवीणता चाचणी (Stream Proficiency Test) द्यावी लागेल. त्यानंतर शारीरिक आणि नंतर वैद्यकीय तपासणी होईल.

शारीरिक चाचणीमध्ये 1.6 किमी धावणे 6 मिनिटे 30 सेकंदात पूर्ण केले पाहिजे. याशिवाय प्रत्येकी एका मिनिटात दहा पुशअप, दहा सिटअप आणि 20 स्क्वॅट्स करावे लागतील.

पगार किती मिळेल

भरती झालेल्या तरुणांना पहिल्या वर्षी दरमहा 30 हजार रुपये, दुसऱ्या वर्षी 33 हजार रुपये, तिसऱ्या वर्षी 36500 रुपये आणि चौथ्या वर्षी 40 हजार रुपये दरमहा वेतन दिले जाणार आहे. चार वर्षांच्या सेवेनंतर 10.04 लाख रुपये दिले जातील.