आजची कविता | गळचेपी : वैशाली गावंडे-कोल्हे

आजची कविता - वैशाली गावंडे -कोल्हे- गळचेपी

गळचेपी .. ‌

कैक आर्त किंचाळने…
जग मात्र बहिरे….
कुणाची तरी बहीण …
मुलगी असते भीषन संकटात ….

जग मात्र अनभिज्ञ……
संविधानाने तिला दिलेले स्वातंत्र्य …..
आणि समाजकंटकांनी ..
तिच्या स्वातंत्र्याची केलेली गळचेपी…….

युग बदलले..
बदलतचं राहिलं…
मात्र ती आजही …
असुरक्षितच आहे…..
असुरक्षितच राहिलं…..
कारण ती स्त्री आहे…….

जगाचे लक्ष तिच्या टिकलीवरच …..
तिच्या सुरक्षिततेसाठी …
कोणता पर्मनंट उपाय राहिलं …
यावर कधी …..?

  • वैशाली गावंडे-कोल्हे