Crime News | पोलिसांना सलाम, 12 वर्षांच्या मुलाची अपहरणानंतर अवघ्या 75 तासांत सुटका

Hats off to police, 12-year-old boy freed in just 75 hours after abduction

डोंबिवली : दीड कोटींच्या खंडणीसाठी एका 12 वर्षीय मुलाचे अपहरण केल्याची घटना डोंबिवली शहरात उघडकीस आली आहे.

मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार आल्यानंतर 200 हून अधिक पोलिस कर्मचार्‍यांची 20 पथके तयार करण्यात आली आणि तीन दिवसांच्या शोध मोहिमेनंतर आरोपींना सुरत येथून अटक करण्यात आली.

अटक करण्यात आलेले आरोपी हे सराईत गुन्हेगार असून मुलाचे अपहरण केल्यानंतर ते वेगवेगळ्या राज्यात फिरत असल्याचेही स्पष्ट झाले आहे.

डोंबिवलीतील एका 12 वर्षीय मुलाचे अपहरण केल्यानंतर नाकाबंदीत अडकू नये म्हणून आरोपी मुख्य रस्ता सोडून गावातील अंतर्गत रस्त्यांवरून प्रवास करत होते.

मात्र ठाणे जिल्हा, नाशिक जिल्हा, पालघर जिल्हा, सिल्वासा आणि गुजरात पोलिसांनी मिळून मुलाची सुटका करून अखेर आरोपीला ताब्यात घेतले.

Bihar Crime News : शेतात झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला अनोळखी तरुणीचा मृतदेह, गावात खळबळ

 

पोलिसांच्या भीतीने आरोपी गाडी सोडून जंगलात पळून गेला होता. त्यानंतर पोलिसांनी 50 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करून आरोपींना शोधण्यासाठी स्थानिक नागरिकांची मदत घेतली. दरम्यान, 75 तासांनंतर पोलिसांनी दोन पुरुषांसह तीन महिलांना अटक केली आहे.

फराहशाह फिरोजशाह रफाई, प्रिस कुमार सिंग, शाहीन मेहतर, फरहिंद सिंग आणि नाझिया रफाई अशी आरोपींची नावे आहेत. दरम्यान, अपहरणकर्त्यांवर खून, दारू तस्करी, घरफोडी असे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.

हे देखील वाचा