WhatsApp मध्ये मोठी उणीव, लाखो लोकांचे मोबाईल नंबर इंटरनेटवर उपलब्ध, संशोधकाचा दावा

WhatsApp in Major flaw millions of people's mobile numbers available on internet, claims researcher

WhatsApp हे खूप लोकप्रिय मेसेजिंग App आहे. इतर App किंवा साइट्सप्रमाणे, त्यातही बग आहेत. ज्यांच्याबद्दल माहिती समोर येत असते.

आता WhatsApp च्या संदर्भात एक मोठी त्रुटी असल्याची माहिती मिळाली आहे. यासह, लाखो WhatsApp युजर्सचे मोबाइल नंबर इंटरनेटवर सार्वजनिकपणे उपलब्ध आहेत.

म्हणजेच, कोणीही त्यात प्रवेश करू शकतो. इथिकल हॅकर अविनाश जैन यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी WhatsApp च्या या त्रुटीबद्दल सांगितले की त्यांनी कंपनीला याबद्दल मेल पाठवला आहे. पण, कंपनीने याला सुरक्षेतील त्रुटी मानली नाही.

वापरकर्त्याचा वैयक्तिक मोबाइल नंबर इंटरनेटवर असताना, घोटाळेबाज त्याचा फायदा घेऊ शकतात. याबाबत सांगण्यात आले आहे की, ज्या यूजर्सनी WhatsApp क्रिएट कॉल लिंक फीचर (WhatsApp Create Call Link feature) वापरला आहे, त्यांचा मोबाईल नंबर तुम्हाला सहज मिळेल.

याशिवाय, WhatsApp चॅटवर शेअर केलेली लिंक असलेला मोबाइल नंबरही गुगलवर सहज शोधता येतो. अविनाश स्पष्ट करतात की, Create Call Link feature युजर्स एखाद्याला सामील होण्यासाठी कॉल लिंक पाठवू शकतात.

पण, या लिंक्स गुगलवर लिस्ट झाल्या. या लिंक्स सर्च करून ओपन केल्यावर यूजरचा मोबाईल नंबर दिसतो. कंपनी याला सामान्य दोष म्हणत आहे. त्यामुळे तक्रार करणाऱ्या व्यक्तीला बक्षीस दिले जात नाही.

येत्या काळात कंपनी हे दुरुस्त करू शकते. पण सध्या या WhatsApp च्या या त्रुटीमुळे लाखो लोकांच्या मोबाईल क्रमांकाचा कोणीही वापर करू (Anyone can take access) शकते.

अविनाशने आधीच Google, Yahoo, NASA, Vmware आणि इतर कंपन्यांना बगची तक्रार करून बक्षीस मिळवले आहे.

हे देखील वाचा