UP Crime News : गँगरेप पीडितेवर पोलिस ठाण्यातच पोलिसांकडून बलात्कार; उत्तर प्रदेशातील संतापजनक प्रकार

7
UP Crime News: Gangrape victim raped by police at police station; Irritable type in Uttar Pradesh

लखनौ : उत्तर प्रदेशातील ललितपूर येथील एका १३ वर्षीय बलात्कार पीडितेची तक्रार देण्यासाठी गेली असताना पोलीस स्टेशनच्या प्रभारीने तिच्यावर बलात्कार केल्याची घटना घडली आहे.

चार जणांनी तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप पीडितेने केला आहे, त्यानंतर ती तक्रार देण्यासाठी नातेवाईकासोबत पोलीस ठाण्यात गेली.

या प्रकरणी आरोपी असलेले स्टेशन हाऊस ऑफिसर टिळकधारी सरोज यांना निलंबित करण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सध्या तो फरार असून पोलिसांची तीन पथके त्याचा शोध घेत आहेत, अशी माहिती ललितपूरमधील एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली. अन्य तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

पोलिस स्टेशनमध्ये तैनात असलेल्या सर्व पोलिसांना ड्युटीवरून हटवण्यात आले आहे. डीआयजी स्तरावरील अधिकारी या प्रकरणाची चौकशी करून २४ तासांत अहवाल सादर करतील.

याप्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका पोलीस अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले असून तो फरार आहे.

22 एप्रिल रोजी एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून चार तरुणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला होता. आरोपींच्या तावडीतून सुटल्यानंतर पीडितेने तक्रार देण्यासाठी पोलिस स्टेशन गाठले.

मात्र, तिला न्याय मिळण्याऐवजी पुन्हा अत्याचार करण्यात आला. एका 13 वर्षीय मुलीने पोलिस अधिकाऱ्याने आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला आहे.

यानंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून आरोपी पोलीस अधिकारी आणि अन्य आरोपींना अटक करण्यासाठी 3 पोलीस पथके तयार करण्यात आली आहेत.

पीडितेने पोलिस अधीक्षकांकडे तक्रार केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी पोलीस अधिकाऱ्याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.