Latur News : अखेर राष्ट्रपती कोविंद यांचा दौरा रद्द ; समारोपास व्हिडिओ संदेश देणार

Udgir: President Kovind's visit finally canceled; Will deliver a video message at the end

लातूर : रविवारी (ता. 24) उदगीरच्या मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपस्थित राहणार नाहीत. (95th All India Literary Convention)

दिल्लीतील व्यस्त वेळापत्रकामुळे त्यांचा दौरा अपरिहार्य कारणामुळे रद्द करण्यात आला आहे. राष्ट्रपती भवनातून असे पत्र आज सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाले.

राष्ट्रपती कोविंद संमेलनासाठी व्हिडिओ संदेश पाठवणार आहेत. जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी याची पुष्टी केली. राष्ट्रपती कोविंद यांची उपस्थिती या संमेलनाचे खास आकर्षण होते, त्यांच्या दौऱ्याने संमेलनाची उंचीही वाढणार होती.

त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून या दौऱ्याचे नियोजन केले जात होते. मात्र, या भेटीसंदर्भात केंद्रीय सुरक्षा यंत्रणेकडून सुरक्षेच्या उपाययोजना सुरू करण्यात आलेल्या नाहीत.

त्यामुळे दौरा रद्द होणार असल्याची चर्चा होती. मात्र, त्यावेळी राष्ट्रपती बिदरमार्गे येतील, अशी आशा साहित्यप्रेमींना होती.

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ आणि महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने 22 ते 24 एप्रिल दरम्यान महाविद्यालयाच्या सुमारे 36 एकर जागेत संमेलन होणार आहे.

उदगीर शहरात राष्ट्रपती येणार कि नाही याची सांशकता होती, कारण प्रशासन तयारी करीत असले तरी अनके जण खाजगीत ‘दौऱ्याबद्दल’ कुजबुज करीत होते. त्यामुळे राष्ट्रपती यांच्या दौरा रद्द झाल्याने ‘अखेर’ कुजबुज खरी ठरली.