रेणापूर : माजी मंत्री तथा सहकारमहर्षी दिलीपराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी (दि. 17) रेणापूर येथील श्रीराम विद्यालयाच्या मैदानावर कबड्डी स्पर्धा व तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष तथा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अॅड. प्रमोद जाधव, रेणाचे तज्ज्ञ संचालक अनिल कुटवाड यांनी केले आहे.
यावेळी माजी आमदार त्र्यंबक भिसे, माजी चेअरमन यशवंतराव पाटील, रेणाचे चेअरमन सर्जेराव मोरे, व्हा. चेअरमन अनंतराव देशमुख, टेवेन्टीवनचे व्हा. चेअरमन विजय देशमुख यांची उपस्थिती राहणार आहे.
कबड्डी स्पर्धेसााठी प्रथम बक्षीस २१ हजार, द्वितीय ११ हजार, तृतीय ७ हजार व प्रोत्साहनपर २ हजार १०० रूपये (दोन स्पर्धकास ) तसेच बुध्दिबळ स्पर्धेसााठी प्रथम बक्षीस ७ हजार, द्वित्तीय ५ हजार , तृतीय ३ हजार तर प्रोत्साहन १ हजार रुपये (दोन स्पर्धकास ) ठेवण्यात आले आहे.
या स्पर्धांत अधिकाधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन संयोजक जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष तथा कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष अॅड. प्रमोद जाधव, रेणाचे तज्ज्ञ संचालक अनिल कुटवाड यांनी केले आहे.
कुमार गटातील जिल्हा स्तरीय ७० किलो वजनी गटाच्या कबड्डी स्पर्धा महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनच्या नियमानुसार होतील याची स्पर्धकांनी नोंद घ्यावी. असे संयोजकांनी सांगीतले.