Maharashtra State board of Secondary and Higher Secondary Education : राज्यातील 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता 10वी परीक्षेचा निकाल जाहीर करण्याची घोषणा केली आहे.
शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्या म्हणजेच 17 जून रोजी दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर होणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल 2022 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र (इ. 10 वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार उद्या दि. 17 जून, 2022 रोजी दु. 1 वा.ऑनलाईन जाहीर होईल असं ट्विट शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केलं आहे.
निकालासाठी अधिकृत वेबसाइट:
याप्रमाणे निकाल तपासा
इयत्ता 10वीचा महाराष्ट्र SSC निकाल पाहण्यासाठी आणि डाउनलोड करण्यासाठी, सर्वप्रथम महाराष्ट्र बोर्डाच्या निकाल पोर्टलच्या www.mahresult.nic.in च्या अधिकृत वेबपेजला भेट द्या.
SSC परीक्षेसाठी MSBSHSE निकालाची अधिकृत वेबसाइट उघडल्यानंतर, SSC परीक्षेचा निकाल प्रदर्शित होईल ज्यावर विद्यार्थी पुढील वेबपृष्ठावर जाण्यासाठी क्लिक करू शकतात.
त्यानंतर आईचे नाव आणि रोल नंबर यासारखी महत्त्वाची ओळखपत्रे जोडण्यास विसरू नका. विद्यार्थ्यांनी दोन्ही आवश्यक क्रेडेन्शियल भरा आणि नंतर व्ह्यू रिझल्ट या पर्यायावर क्लिक करा. तुमचा निकाल तुमच्या समोर असेल. पुढील संदर्भासाठी निकाल डाउनलोड करा किंवा जतन करा.
निकालासह विविध सांख्यिकीय माहिती
परीक्षेत बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित गुण वरील संकेतस्थळावरून उपलब्ध होतील आणि या माहितीची प्रिंटही उपलब्ध होईल.
विद्यार्थ्यांच्या निकालासोबतच www.mahresult.nic.in या वेबसाइटवर विविध सांख्यिकीय माहितीही उपलब्ध होणार आहे. शाळांचा एकूण निकाल www.mahahsscboard.in या वेबसाइटवर उपलब्ध होईल, असेही बोर्डाने कळवले आहे.