धक्कादायक : पत्नी पाठोपाठ पतीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या, आत्महत्येचे कारण अस्पष्ट 

0
27
Crime News

नाशिक : पत्नीच्या पाठोपाठ पतीनेही विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील खेलदरी येथे ही घटना घडली. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. या घटनेची पोलिसात नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चांदवड तालुक्यातील खेलदरी येथे रेखा दौंड यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली.

तिच्या पाठोपाठ पती किरण दौंड यानेही विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. पती-पत्नीने एकाच वेळी आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट, घटनेची नोंद वडनेर भैरव पोलीस ठाण्यात करण्यात आली. पुढील तपास पोलीस करत आहेत.