Crime News : गोवा बनावटीची ६ लाखांची विदेशी दारू, ५१ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक

Crime News: Goa-made foreign liquor worth Rs 6 lakh, goods worth Rs 51 lakh seized, two arrested

Crime News : राज्य उत्पादन शुल्क इस्लामपूर विभागाने वाळवा तालुक्यातील येलूरजवळ कारवाई केली आहे. या कारवाईत १ लाख ४० हजार रुपयांची विदेशी दारू जप्त करण्यात आली. 6 लाख 5 हजार 520 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

एकूण 51 लाख 7,780 रुपयांचा इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे.

गोवन बनावटीच्या विदेशी दारूसह एक सहा चाकी कंटेनर, ब्रिझा कार व कंटेनरमधील इतर साहित्य जप्त करण्यात आले. पुढील तपास राज्य उत्पादन शुल्कचे महानिरीक्षक प्रशांत रासकर यांच्या नेतृत्वाखाली सुरू असून पुढील तपास सुरू आहे.

गोवा मूळची विदेशी मद्य गोव्यातून येलूरमार्गे कंटेनरने पुण्याला नेण्यात येणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभाग इस्लामपूर यांना मिळाली होती.

येलूर येथे गोवा बनावटीची विदेशी दारू, सहा चाकी कंटेनर, एक ब्रिझा कार व कंटेनरमधील इतर साहित्य असा एकूण 51,07,780 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही कारवाई काल (रविवारी) दुपारी 3.15 वाजता करण्यात आली. 180 मिलीच्या 3840 बाटल्या व मालवाहू कंटेनर MH12 QG2279 यासह पायलटिंग कार ब्रीझ MH50L9970 कार व इतर माल जप्त करण्यात आला.

मा.आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई कांतीलाल उमाप, विभागीय उपायुक्त माननीय वाय.एम.पवार यांच्या आदेशानुसार उत्पादन शुल्क सांगलीच्या अधीक्षक संध्याराणी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली आहे.

राज्य उत्पादन शुल्क इस्लामपूरचे निरीक्षक प्रशांत रासकर, उपनिरीक्षक शंकर रणपिसे, उपनिरीक्षक अविनाश घाटगे, सहायक उपनिरीक्षक उदय पुजारी जवान राकेश बनसोडे, संतोष वेडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.