पुणे : कोरोना महामारीनंतर दोन वर्षांनी दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या निकालाबाबत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पुणे राज्य शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या परीक्षांचे निकाल 10 जूनपूर्वी जाहीर होणार आहेत. राज्य शिक्षण मंडळाने हि माहिती दिली आहे.
12वीचा निकाल 10 जूनपर्यंत जाहीर केला जाईल, त्यानंतर 8 दिवसांनी 10वीचा निकाल जाहीर होईल, असे बोर्डाचे म्हणणे आहे.
दरम्यान, शिक्षकांनी 10वी आणि 12वीचे पेपर तपासण्यास नकार दिला होता, त्यामुळे निकालाला उशीर होण्याची अपेक्षा होती, मात्र आता परीक्षेचे निकाल वेळेत जाहीर होतील, असे मंडळाने जाहीर केले आहे.
विद्यार्थ्यांना वेठीस धरू नये
विनाअनुदानित शाळांना 100 टक्के अनुदान मिळावे. शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सेवा संरक्षण मिळावे या मागणीसाठी शिक्षकांनी पेपर तपासणीवर बहिष्कार टाकला आहे.
मात्र, शिक्षकांनी पेपर तपासणीवर बहिष्कार टाकल्याने निकालावर कोणताही परिणाम होणार नसल्याचे राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी म्हटले आहे.
पहिल्यांदाच बोर्डाच्या परीक्षा ऑफलाइन
बारावीचे पेपर उशिरा सुरू झाल्यामुळे, बारावीचे निकालही १० जूनपर्यंत जाहीर केले जातील आणि दहावीचा निकाल पेपर संपल्यानंतर ८ दिवस लागतील, असे बोर्डाने म्हटले आहे.
कोरोना महामारीनंतर पहिल्यांदाच बोर्डाच्या परीक्षा ऑफलाइन घेण्यात आल्या. गेल्या वर्षी दहावी आणि बारावीचा निकाल ९९ टक्क्यांहून अधिक लागला होता.