राहुल गांधींची लिंगायत दिक्षा ही केवळ लिंगायत मतांसाठी केलेले नाटक आहे : शिवानंद हैबतपूरे

Rahul Gandhi's Lingayat Diksha is a play for Lingayat votes only: Shivanand Haibatpure

लातूर : राहुल गांधीनी स्विकारलेली इष्टलिंग दिक्षा ही केवळ लिंगायत मतांसाठी केलेले नाटक असून काँग्रेस त्याच्या सोई व सवयी प्रमाणे जातियवादी राजकारणाला खतपाणी घालत असल्याचे मत; भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते व लिंगायत नेते शिवानंद हैबतपूरे यांनी व्यक्त केले.

कर्नाटक दौऱ्यावर असताना काँग्रेस नेते राहुल गांधींनी चित्रदुर्ग येथील लिंगायत मठात सदिच्छा भेट दिली असता मठाचे स्वामी श्री शिवमूर्ती शरणरु यांनी त्यांचे स्वागत केले.

Rahul Gandhi:

राहुल गांधींना चित्रदुर्ग स्वामींनी कपाळावर त्रिपूंड धारणा करुन गळ्यात रुद्राक्ष माळ व इष्टलिंग बांधले. यानंतर राहुल गांधींनी मी इष्टलिंग दिक्षा घेतल्याचे ट्विट केले.

या संदर्भात आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना शिवानंद हैबतपूरे म्हणाले की राहुल गांधीनी जर खरंच लिंगायत दिक्षा घेतली असेल तर मी त्यांचे स्वागत करतो पण त्यांची ही दिक्षा धार्मिक दिक्षा नसून तो एक राजकीय डावपेचाचा भाग आहे.

वास्तविक पहाता धर्म आणि राष्ट्र या दोन्ही तत्वापासून काँग्रेस खूप दूर आहे. धर्माचा केवळ राजकीय मतांसाठी वापर करणे. त्यासाठी एकसंघ अशा हिंदू समाजात फूट पाडणे हा काँग्रेसचा पूर्वापारपासूनचा पायंडा आहे.

राहुल गांधी

यासाठीच राहुल गांधी कधी जानवे घालून मी दत्तात्रय गोत्री ब्राह्मण म्हणून सांगतात तर कधी चर्च मध्ये जाऊन पवित्र पाणी प्राशन करतात. तर कधी इफ्तार पार्टीत टोपी घालून आपले कश्मिरी नाते व्यक्त करतात. खरं तर इथल्या भरतभुवरल्या कुठल्याही धर्मपरंपरांचे गांधी घराण्याला कुठलेच प्रेम नाही.

केवळ कर्नाटकाच्या निवडणुका समोर ठेवून राहुल गांधींनी हे नवनाट्य केले आहे. वास्तविक पहाता राहुल गांधींना इष्टलिंग व रुद्राक्ष हे पाहुणचार म्हणून मिळाले आहे. कारण लिंगायत परंपरेने दिली जाणारी दिक्षा ही वेगळ्या स्वरुपाची असते.

त्यासाठी धार्मिक विधी व प्रकिया असते. वचनशास्त्र बोध करावा लागतो. विधी निषेध पाळावे लागतात. पण असा कुठलाही विधी न करता केवळ राजकीय स्टंट म्हणून बहुधा त्यांनी ही दिक्षा स्वीकारल्याचे दिसते.

इटलीच्या संस्कारात बीफ आवडीने खातात पण लिंगायत परंपरेत मांसाहार वर्ज्य आहे. राहुलजींनी याबाबत खुलासा करायला हवे आहे.जर खरच इष्टलिंग योग व बसव तत्वज्ञान याचा राहुल गांधींना आदर असेल तर त्यांनी लिंगायतांना आजपर्यंत लोकसंख्येच्या प्रमाणावर राष्ट्रीय व राज्यपातळीवर प्रतिनिधित्व का दिले नाही? लिंगायतांची बहुतांश तिर्थस्थळे ही आजही मुघली व निजामी आक्रमकांच्या विळख्यात अडकलेली आहेत.

बसवकल्याण येथील बसवादी शरणांच्या महान अनुभव मंटपावर पीर पाशा बंगला नावाने झालेले अतिक्रमण असेल की कंधार येथील ऊरिलिंग पेद्दी या लिंगायत मठावर उभा असलेला दर्गा असेल.

यासारख्या असंख्य ऐतिहासिक प्रेरणास्थळावरील आक्रमणाबद्दल आता राहुल गांधीची भुमिका काय असेल हे स्पष्ट होईल का? कायक-दासोह-समता आणि स्वातंत्र्याचा जयघोष करणार्या बसवण्णांच्या अनुयायांची राजकीय गळचेपी करणारी काँग्रेस आता हे नवे डावपेच रचत आहे.

कर्नाटकात लिंगायतांची संख्या ही एकुण मतांच्या वीस टक्के पेक्षा जास्त आहे. केवळ कर्नाटकातच नाही तर महाराष्ट्रातही कर्नाटक व आंध्र तेलंगणा लगत सीमावर्ती जिल्ह्यात लिंगायत निर्णायक मतांचे मालक आहेत.

हा सगळा विचार करुनच राहुलजींनी हे लिंगदिक्षा नाट्य केले आहे.पण गेल्या पन्नास वर्षाच्या कर्नाटकातील राजकारणात लिंगायत कधीही काँग्रेसच्या मागे थांबला नाही. अगदी इंदिरा गांधींच्या दुर्दैवी हत्येनंतर ही देशभर निर्माण झालेल्या सहानुभूतीच्या लाटेतही लिंगायतांनी काँग्रेसला साथ दिली नाही.

त्याकाळी जनता दलाचे जे.एच.पटेल मुख्यमंत्री झाले. एकंदरीतच काँग्रेस ही लिंगायतांची कधीही होऊ शकत नाही हे लिंगायतांनी ओळखले आहे म्हणूनच काँग्रेस ने जातीधर्माचे कार्ड बाहेर काढले आहे.

धर्म आणि राष्ट्र म्हणून आम्ही हिंदू आहोत व आम्हाला आमच्या हिंदुत्वाचा अभिमान आहे. हिंदुत्व हेच राष्ट्रियत्व आहे यावर आम्हा लिंगायतांचा विश्वास आहे. म्हणूनच देशभरातील आठ कोटी लिंगायतांची शक्ती भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे.

जगाच्या पाठीवर भारताला सर्वश्रेष्ठ बनवण्यासाठी परिश्रम करणारे मा.नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वावर लिंगायतांचा पुर्ण विश्वास आहे. राहुल गांधींनी अशी कितीही नाटकं केली तरी काँग्रेसला लिंगायत थारा देणार नाहीत; असा विश्वास शिवानंद हैबतपूरे यांनी व्यक्त केले.