प्रांजली आणि वाजिद ‘प्रेमप्रकरणात अपयशी’ ठरल्याने दोघांची गळफास घेऊन आत्महत्या, धक्कादायक कारण आले समोर

सोलापूर : हिंदू मुलगी आणि मुस्लिम पुरुष प्रेमप्रकरणात अपयशी ठरल्याने दोघांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोलापुरात (Solapur District) घडली आहे.

सदर घटनेने जिल्हाभरात मोठी खळबळ उडाली आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील बीबीदारफळ या गावात सोमवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास सदर घटना घडली आहे.

आमचं प्रेम समाजाला मान्य नाही, अशी चिठ्ठी लिहून प्रेमीयुगुलाने गळफास घेऊन आत्महत्या (Sucide) केली आहे. सदर घटनेची तालुका पोलीस ठाणे (Police Thane) येथे नोंद झाली आहे.

मंगळवारी सकाळी उघडकीस आली घटना

मिळालेल्या माहितीनुसार, प्रांजली भारत सुतार ही महाविद्यालयीन शिक्षण घेता आहे. गणेश विद्यालयात मागील वर्षीच इयत्ता १२ वीच्या परीक्षेत तिने प्रथम क्रमांक मिळवला होता.

प्रथम क्रमांक मिळविलेल्या प्रांजली भारत सुतार हिचे विवाहित असलेल्या वाजिद चाँद इनामदार सोबत अनेक दिवसांपासून प्रेमसंबंध होते अशी देखील माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.

प्रेम करून देखील त्याचा काहीच उपयोग होणार नाही हे कळल्यावर विवाहित असलेल्या वाजिद चाँद इनामदार आणि प्रांजलीने राहत्या घरात एकाचं दोरीने गळफास घेतला.

ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली.दोघांचे शव सोलापुरातील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनसाठी दाखल करण्यात आले आहे.

प्रांजली आणि वाजीदने आत्महत्या करण्यापूर्वी दोन चिठ्ठ्या लिहिल्या होत्या. दोघानी लिहिलेली सुसाईड नोट आता पोलिसांच्या हाती लागली आहे.

या चिठ्ठीत ‘आमचं प्रेम समाजाला मान्य नाही, आमच्या आत्महत्येला कोणासही जबाबदार धरू नये’, असा मजकूर लिहून ठेवला होता. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

सदर घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. यानंतर दोन्ही मृतदेह खाली उतरवण्यात आले. त्यानंतर शवविच्छेदनासाठी सोलापुर येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले.

पोलिसांनी कसून तपास केला असता या प्रेमी युगुलाने आत्महत्या करण्यापूर्वी स्वतंत्र दोन चिठ्ठ्या लिहिल्या होत्या. त्या चिठ्ठ्या पोलिसांच्या हाती लागल्या आहेत. याबाबत अधिक तपास तालुका पोलीस करत आहेत.