पोस्ते पोदार चे सीबीएसई दहावी बोर्ड परीक्षेत दैदिप्यमान यश, तालुक्यातून पहिला येणारा विदयार्थी पोस्ते पोदारचा

पोस्ते पोदार चे सीबीएसई दहावी बोर्ड परीक्षेत दैदिप्यमान यश

सिबीएसई वार्षिक परीक्षेत पहिल्याच बॅचचा 100 टक्के निकाल. 20 विद्यार्थी 90 टक्के च्या पुढे.

उदगीर: येथील नामांकीत सीबीएसई स्कूल पोस्ते पोदार लर्न स्कूल ने दहावी सिबीएसई वार्षिक परीक्षेत घवघवीत यश प्राप्त केले आहे.

एप्रिल – मे २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या वार्षिक परीक्षेचा निकाल सिबीएसई बोर्डाने जाहीर केला असून त्यात साई कावठाळे 98 टक्के घेऊन प्रथम तर आरती आरडवाडे 97.2 टक्के घेऊन द्वितीय तर, झैद सय्यद 96.2 टक्के घेऊन तृतीय तसेच वैदेही येरोळकर 95.8 टक्के गुण घेऊन चतुर्थ व दीक्षा पाटिल 95.2 टक्के घेउन पाचवी आली आहे.

तसेच मयुरी मोरे 94.8, ऊर्वी पाटील 94.8, श्रवण कोनाळे 94.6, सलोनी मलगे 94.6, अनिकेत करखेलकर 94.4, मनस्वी पेंसलवार 93.8, मानसी शेकापुरे 93, अदिती भोसले 92.8, आलोक बिराजदार 92.6, शुभम अचारे 92.4, सारा सिद्दीकी 91, मयूर इडळगावे 90.2, ओमकार तवंडे 90, चैतन्य गर्जे 90 व अथर्व पाटील 90 टक्के घेऊन गुणवत्ता यादीत आले आहेत.

एकूण 79 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली 

पहिल्या बॅच चा हा यशस्वी निकाल लागल्या बद्दल संस्थेचे सचिव सुरज पोस्ते, संस्थेच्या अध्यक्षा प्रियांकाताई पोस्ते, प्राचार्य सुर्यकांत चवळे, मार्गदर्शक धर्मपाल देवशेट्टे यांनी विद्यार्थी पालकांचे व शिक्षकांचे कौतुक व अभिनंदन केले.

दर्जेदार शिक्षण देण्यासाठी पोस्ते पोदारने आपली ओळख निर्माण केली आहे. या निकालाने शाळेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणावर शिक्कामोर्तब झाले आहे. सीबीएसई परीक्षेत नवा उच्चांक गाठल्याबद्दल शाळेचे पालक व मान्यवरांनी कौतुक केले आहे.