Crime News : आईने तोंड दाबले, वडिलांनी केला बलात्कार, मुलीच्या तोंडून घटना ऐकून पोलीसही गोंधळले

53
Crime News

नवी दिल्ली : नराधम पित्याने आठ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. त्यामुळे संपूर्ण शहरात (बरेली) खळबळ उडाली आहे.

विशेष म्हणजे जेव्हा वडिलांनी मुलीवर बलात्कार केला तेव्हा मुलीच्या सावत्र आईने वडिलांना मदत केल्याची तक्रार पोलिसात दाखल करण्यात आली आहे.

उत्तर प्रदेशातील बरेली भागात ही घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मुलीच्या आरोपी वडील आणि सावत्र आईला अटक केली. ही घटना रात्री घडली, सकाळी घटना मुलीने काकाला सांगितली.

नराधम बाप बलात्कार करत असताना तिच्या सावत्र आईने मुलीचा चेहरा दाबला होता. जेव्हा सकाळी मुलीने आपल्या काकांना घडलेल्या घटनेची माहिती दिली. त्यानंतर ही बाब उघडकीस आली.

आरोपी केसर हा रेल्वे स्थानक परिसरात बूट पॉलिशरचे काम करतो. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. काही दिवसांपूर्वी आरोपी तुरुंगातून बाहेर आल्याचे मुलीच्या काकांनी पोलिसांना सांगितले आहे. दोन्ही आरोपींची पोलीस कसून चौकशी करणार असल्याचे सांगण्यात आले.