Rishabh Pant Health Update : ऋषभ पंतच्या चाहत्यांसाठी निराशाजनक बातमी, IPL नंतर एकदिवसीय विश्वचषक 2023 मधूनही बाहेर?

Rishabh Pant Health Update : ऋषभ पंत आणि भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी मुंबईच्या कोकिलाबेन हॉस्पिटलमधून एक निराशाजनक बातमी आहे.

बीसीसीआयच्या वैद्यकीय संघाच्या जवळच्या सूत्रांनी इनसाइडस्पोर्टला सांगितले की रुग्णालयातील डॉक्टरांना वाटते की, पंतला मैदानात परत येण्यासाठी किमान 8-9 महिने लागू शकतात.

याचा अर्थ पंत केवळ आयपीएल 2023 मधूनच नाही तर आशिया चषक 2023 आणि ऑक्टोबरमध्ये होणार्‍या एकदिवसीय विश्वचषकातूनही बाहेर राहणार आहे.

मुंबईतील कोकिलाबेन हॉस्पिटलमधील स्पोर्ट्स ऑर्थोपेडिक्सचे संचालक डॉ परडीवाला यांच्या नेतृत्वाखालील डॉक्टरांच्या पथकाने गुरुवारी सकाळी पंतची तपासणी केली.

सूत्रांनी इनसाइडस्पोर्टला सांगितले की, सूज कमी होईपर्यंत पंतचा एमआरआय किंवा शस्त्रक्रिया होणार नाही. ऋषभ पंतच्या लिगामेंटला गंभीर दुखापत झाली असून तो पूर्णपणे बरा होण्यासाठी ८ ते ९ महिने लागतील, असे रुग्णालयातील डॉक्टरांचे मत आहे.

ऋषभ पंतला बुधवारी बीसीसीआयने मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात एअरलिफ्ट केले. रुग्णालयाच्या डॉक्टरांच्या अहवालानंतर बीसीसीआय पंतवर भारतात शस्त्रक्रिया करायची की त्याला शस्त्रक्रियेसाठी लंडनला नेणार याचा निर्णय घेणार आहे.

गुडघ्याच्या अस्थिबंधनाच्या शस्त्रक्रियेला साधारणपणे 6 महिने लागतात. पण मुद्दा असा आहे की पंत हा यष्टिरक्षक आहे आणि त्याने क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यापूर्वी त्याचा गुडघा मजबूत करणे आवश्यक आहे.

बाकीचे डॉक्टर पंतची योग्य तपासणी करतील, त्यानंतरच खेळाडू कधी बरे होतील हे सांगता येईल. सध्या तरी पंतचे भवितव्य पूर्णपणे अधांतरी आहे.

ऋषभ पंत ‘या’ मालिकेत नाही खेळणार

  • भारत विरुद्ध न्यूझीलंड (3 वनडे, 3 टी-20) – जानेवारी-फेब्रुवारी
  • भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (4 कसोटी आणि 3 वनडे) – फेब्रुवारी-मार्च
  • IPL 2023 (एप्रिल-मे)
  • वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल (जर भारत पात्र झाला तर) – जून
  • भारताचा वेस्ट इंडिज दौरा (जुलै)
  • आशिया कप 2023 – सप्टेंबर
  • ICC एकदिवसीय विश्वचषक – ऑक्टोबर/नोव्हेंबर

ऋषभ पंतच्या दुखापतीनंतर आता आयपीएल संघ दिल्ली कॅपिटल्सला त्यांच्या नव्या कर्णधाराचा शोध घ्यावा लागणार आहे.

या स्थितीत दिल्ली कॅपिटल्सची कमान डेव्हिड वॉर्नरकडे सोपवली जाण्याची शक्यता आहे. गरज भासल्यास संघ मुंबईचा फलंदाज सर्फराज खानला विकेटकीपिंग देऊ शकतो, असेही सूत्रांनी सांगितले.