PM Kisan Big Update : केंद्र सरकारने सुरु केलेल्या पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 11व्या हफ्त्याची कोट्यवधी शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहेत.
पीएम किसान या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी यासाठी केंद्र सरकार दरवर्षी सहा हजार रुपयांची मदत देत असते.
पीएम किसान या योजनेच्या माध्यमातून शेतकर्यांना आतापर्यंत 10 हप्त्यांचे पैसे मिळाले आहेत, तर पुढचा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, पुढच्या महिन्यात म्हणजे मे महिन्यात पीएम किसान योजनेचे दोन हजार रुपये करोडो शेतकऱ्यांच्या खात्यात येऊ शकतात.
तथापि, यासाठी शेतकऱ्यांनी ई-केवायसी करणे अनिवार्य आहे, अन्यथा ते पीएम किसानच्या लाभांपासून वंचित राहू शकतात.
पीएम किसान योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर शेतकऱ्यांना आता ई-केवायसी करावी लागणार आहे. जर शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली नसेल तर त्यांना पुढील हप्त्यापासून वंचित ठेवले जाऊ शकते.
नुकतेच काही दिवसांपूर्वी, ई-केवायसीची अंतिम तारीख 31 मे 2022 पर्यंत वाढवण्यात आली आहे. आणि आता शेतकरी आधार कार्डद्वारे देखील eKYC करू शकतात.
यासोबतच जवळच्या सीएससी केंद्रावर जाऊन बायोमेट्रिक केवायसीही करता येणार आहे.
या लोकांना पण नाही मिळणार पैसा
पीएम किसान योजनेबाबत अनेक प्रकारचे नियम बनवण्यात आले आहेत. अनेक शेतकरी या पीएम किसान योजनेसाठी पात्र नाहीत.
संस्थागत शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळत नाही. असे लोक जे घटनात्मक पदावर आहेत, त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
केंद्र किंवा राज्य सरकारच्या कोणत्याही विभागात किंवा PSU किंवा कोणत्याही सरकारी संस्थेत काम करणारी व्यक्ती शेती करत असेल तर त्याला या योजनेचा लाभ मिळणार नाही.