शरद पवारांविषयी आक्षेपार्ह पोस्ट, मराठी अभिनेत्री केतकी चितळेला पोलिसांनी घेतलं ताब्यात

Marathi Actress Profile, Biography, Biodata, Wiki, Age, Family

मुंबई : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार (NCP leader Sharad Pawar) यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका करणाऱ्या टीव्ही मालिकांमध्ये काम करणारी अभिनेत्री केतकी चितळे (Actress Ketki Chitale) हिच्या अडचणी वाढत आहेत.

याप्रकरणी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी तक्रार दाखल केल्यानंतर ठाणे पोलिसांनी केतकी चितळेवर कडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने केतकी चितळे हिला नवी मुंबईतून अटक केली आहे. पुढील कायदेशीर कारवाई पोलीस करत आहेत.

अभिनेत्री केतकी चितळे हिच्या अटकेची घोषणा राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून केली आहे.

त्यांनी आपल्या ट्विटमध्ये केतकी चितळेला अटक केल्याबद्दल ठाणे आणि नवी मुंबई पोलिसांचे अभिनंदन केले आहे. गेल्या सात महिन्यांपासून केतकी कळंबोली येथील एव्हलॉन इमारतीत राहत होती.

अभिनेत्री केतकी चितळे बायोग्राफी | Ketaki Chitale Marathi Actress Profile, Biography, Biodata, Wiki, Age, Family

याप्रकरणी केतकी चितळे विरोधात ठाण्यातील कळवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते स्वप्नील नेटके यांनी ही तक्रार दाखल केली होती.

केतकी चितळेवर महाराष्ट्रात आतापर्यंत एकूण तीन गुन्हे दाखल आहेत. केतकी चितळे हिने शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट केल्यानंतर राज्यभरातील राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. केतली चितळे यांचा निषेध करत अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहिल्या आहेत.