नवी दिल्ली : महापालिका निवडणुकीबाबत सर्वोच्च न्यायालयात सोमवारी महत्त्वाची सुनावणी होणार होती. सुनावणी पुन्हा पुढे ढकलण्यात आली आहे. आता 4 मे रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे.
ओबीसी आरक्षण (OBC Reservation) रद्द केल्यानंतर निवडणुकीच्या तारखा आणि प्रभाग निश्चित करण्याचे अधिकार महाराष्ट्र सरकारने आपल्या ताब्यात घेतले आहेत.
सरकारच्या निर्णयाविरोधात तेरा स्वतंत्र याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. सोमवारी या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणे अपेक्षित होती.
मात्र, अखेर सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार हा प्रश्न अद्यापही अनुत्तरीत आहे. आता 4 मे रोजी हा प्रश्न सुटतो का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
निवडणूक कधी होणार?
मुंबई, पुणे, कोल्हापूर, पिंपरी-चिंचवडसह 20 हून अधिक महापालिकांच्या निवडणुका कधी होणार हे आज स्पष्ट होईल, अशी आशा होती. पण शेवटी निराशाली झाली.
महापालिका निवडणुका दिवाळीपर्यंत पुढे ढकलल्या जाणार का याकडे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
4 मे रोजी निकालाकडे लक्ष लागले आहे
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यामुळे निवडणुका लांबल्या आहेत. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेऊ नयेत, अशी भूमिका सर्वच पक्षांनी घेतली आहे. त्यानंतर वॉर्ड रचनेचे अधिकार सरकारला देण्यात आले.
प्रभाग रचनेबाबत सरकारने घेतलेल्या निर्णयाविरोधात आणि निवडणुका पुढे ढकलल्याच्या विरोधात एकूण 13 याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाल्या आहेत.