जयपूर : राजस्थानच्या धौलपूरमध्ये एका दलित महिलेवर तिचा पती आणि मुलांसमोर बलात्कार करण्यात आला. पीडितेच्या म्हणण्यानुसार, सुमारे अर्धा डझन लोकांनी बंदुकीच्या जोरावर हे कृत्य केले. आरोपी फरार असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंगळवारी सायंकाळी पीडित महिला आणि तिचा पती कामावरून परतत असताना आरोपींनी त्यांना अडवले. महिलेच्या पतीला बेदम मारहाण करण्यात आली, त्यानंतर चाकूचा धाक दाखवत तिच्यावर बलात्कार करण्यात आला.
यानंतर आरोपीनेही तिला मारहाण करून पळ काढला. यावरून राजस्थानमध्ये काँग्रेसच्या राजवटीत किती कायदा आणि सुव्यवस्था राहिली आहे, हे दिसून येते.