MH BOARD 12TH RESULT | महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीचा निकाल जाहीर केला आहे. बारावीचा निकाल दहावीइतकाच चांगला लागला असून दरवर्षीप्रमाणे यंदाही निकालात मुलींनी बाजी मारली आहे.
यंदा ९५.३५ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. यावेळी 6,53,276 मुलींनी परीक्षा दिली होती त्यापैकी 6,22,905 मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. उत्तीर्णतेची टक्केवारी ९३.२९ टक्के आहे. याचा अर्थ मुलांपेक्षा २.०६ टक्के जास्त मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.
कसा चेक कराल आपला निकाल
स्टेप 1 – https://marathi.abplive.com/ वर लॉन ऑन करा
स्टेप 2- बारावी निकालाच्या बॅनरवर क्लिक करा
स्टेप 3- तिथं असलेल्या बॉक्समध्ये आपला सीट नंबर टाका
स्टेप 4- तुमच्या आईच्या नावातील पहिली तीन अक्षरं लिहा
स्टेप 5- एंटर केल्यानंतर तुमचा निकाल स्क्रिनवर दिसेल
स्टेप 6- निकालाची प्रिंट आऊट घ्या किंवा मोबाईलमध्ये सेव्ह करा
Maharashtra HSC Results : बारावीचा निकाल जाहीर; राज्याचा निकाल 94.22 टक्के; कोकण विभागाची बाजी, मुंबई पिछाडीवर
बारावीच्या नियमित विद्यार्थ्यांचा एकूण निकाल ९४.२२ टक्के लागला आहे. फेब्रुवारी-मार्च 2020 च्या तुलनेत हा निकाल एकूण 3.56 टक्क्यांनी वाढला आहे.
बारावीच्या परीक्षेसाठी राज्यातील नऊ विभागीय मंडळांमधून एकूण १४ लाख ४९ हजार ६६४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी 13 लाख 56 हजार 604 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
महाराष्ट्र स्टेट बोर्ड बारावीचा निकाल हा अखेर जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये बारावीचा एकूण निकाल 94.22% इतके टक्के लागला आहे.
एकूण निकाल (HSC Result 2022 Maharashtra Pass Percentage state board)
- 2020 च्या तुलनेत सुमारे पाच टक्य्यांनी वाढला निकाल.
- एकूण 153 विषयांपैकी 24 विषयांचा निकाल 100 टक्के लागला आहे.
- विज्ञान शाखेचा राज्याचा 98.30 टक्के इतका बंपर निकालन लागला आहे.
- कला शाखेचा राज्याचा निकाल 90.51 टक्के इतका निकाल लागला आहे.
- वाणिज्य विभागाचा निकाल 91.71 टक्के इतका लागला आहे.
- राज्याच्या एकूण विभागांपैकी कोकण या विभागाचा निकाल सर्वात 97.21 टक्के लागला आहे. तर सर्वात कमी निकाल मुंबई या विभागाचा लागला आहे.
- यंदाच्या निकालात विद्यार्थिनींचाच डंका आहे. विद्यार्थीनीचा निकाल 95.32 टक्के इतका आहे तर विद्यार्थ्यांचा निकाल 93.29 % इतका आहे.
- महाराष्ट्र स्टेट बोर्ड बारावीची परीक्षा ही संपूर्ण राज्यभरातील एकूण 14 लाख 85 हजार 826 विद्यार्थ्यांनी दिली होती. यापैकी विभागनिहाय विद्यार्थ्यांची संख्या पुढीलप्रमाणे होती.
- विज्ञान – 6 लाख 32 हजार 994
- आर्टस् – 4 लाख 37 हजार 336
- कॉमर्स – 3 लाख 64 हजार 362
- व्यावसायिक अभ्यासक्रम – 50 हजार 202
निकालाची वैशिष्ट्ये
- सर्वाधिक निकाल कोकण विभाग – ९७.२१ टक्के
- सर्वात कमी निकाल मुंबई विभाग – ९०.९१ टक्के
- व्यवसाय अभ्यासक्रमांचा निकाल ९८.८० टक्के
- दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल – ९५.२४ टक्के
शाखानिहाय निकाल
- विज्ञान शाखा – ९८.३०टक्के
- वाणिज्य शाखा – ९०.५१ टक्के
- कला शाखा – ९१.७१टक्के
- व्यवसाय अभ्यासक्रम – ९२.४० टक्के
विभागनिहाय टक्केवारी
- कोकण – ९७.२१टक्के
- पुणे- ९३.६१टक्के
- नागपूर – ९६.५२ टक्के
- औरंगाबाद – ९४.९७टक्के
- मुंबई- ९०.९१टक्के
- कोल्हापूर -९५.०७टक्के
- अमरावती – ९६.३४ टक्के
- नाशिक – ९५.२५ टक्के
- लातूर – ९५.२५ टक्के