Maruti Suzuki to Shift Flex Fuel : मारुती डिझेलनंतर पेट्रोल गाड्याही बंद करणार? आता सेलेरिओ या नव्या इंधनावर येतेय !

Maruti Suzuki to Shift Flex Fuel: Will Maruti shut down petrol vehicles after diesel? Now Celerio is coming on this new fuel!

Maruti Suzuki to Shift Flex Fuel : देशातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या मारुती सुझुकीने दोन वर्षांपूर्वी मोठा निर्णय घेतला होता. त्यानंतर कंपनीकडून डिझेल वाहने बंद करण्यात आली.

पेट्रोल तसेच सीएनजी वाहनांना प्राधान्य देण्यात आले. आता मारुती नवीन इंधनावर कार आणणार आहे. मारुतीने नुकतीच लाँच केलेली सेलारिओ नवीन इंधनावरील चाचणी दरम्यान दिसली आहे

नितीन गडकरी यांनी अनेक कंपन्यांना फ्लेक्स फ्युएलवर कार लॉन्च करण्याचे आदेश दिले होते. अनेक कंपन्यांकडे फ्लेक्स इंधनावर चालणारी वाहने आहेत.

ती वाहने परदेशात विकले जातात. त्याची भारतात विक्री का होत नाही यावर त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. आता मारुतीने ते सुरू केले आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत.

यातूनच मारुतीने मोठी घोषणा करून आघाडी घेतली आहे. सीएनजी मार्केटचा बादशाह असलेल्या मारुतीने फ्लेक्स इंधनावर वाहने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सेलेरियो या इंजिनचे वाहन दिल्लीत चाचणीदरम्यान दिसले आहे.

देशातील सर्वाधिक मायलेज देणारी कार मारुती सेलेरियोचे सीएनजी व्हेरिएंट लॉन्च करण्यात आले आहे. सीएनजीमधील मारुती सुझुकी सेलेरियो एस-सीएनजीचे मायलेजही जबरदस्त आहे.

कंपनीचा दावा आहे की ती 35.60 किमी प्रति किलोची रेंज देत आहे. सेलेरियो ही मारुतीची सहावी CNY कार आहे.

Celerio ची भारतीय बाजारपेठेत एक्स-शोरूम किंमत 6.58 लाख रुपये आहे. ही CNG कार VXi प्रकारात लॉन्च करण्यात आली आहे. पेट्रोलपेक्षा ही कार 45,000 रुपये महाग आहे. हे K10C पेट्रोल इंजिनद्वारे चालणारी आहे.

मारुती सुझुकी सेलेरियो S-CNG मध्ये बसवलेले इंजिन 5300 rpm वर 41.7kW पॉवर जनरेट करते. पेट्रोल इंजिन 5500 rpm वर 48.0kW पॉवर निर्माण करते.

मारुती सुझुकी सेलेरियो 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह येते. सीएनजीसाठी 60 लिटरची टाकी देण्यात आली आहे.