Mahatransco Recruitment 2022 : राज्य विद्युत विभागात भरती, ८० हजार रुपयांपर्यंत मिळेल पगार

Mahatransco Recruitment 2022: Recruitment in State Electricity Department, Salary up to Rs. 80,000

Mahatransco Recruitment 2022 : सरकारी नोकऱ्या शोधणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाचे अपडेट आहे. महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कंपनी लिमिटेड (MSETCL) विविध पदांसाठी भरती करत आहे. येथे निवडलेल्या उमेदवारांना चांगली नोकरी तसेच बंपर पगार दिला जाईल.

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड येथे असिस्टंट इंजिनीअर ट्रान्समिशन (Assistant Engineer Transmission), असिस्टंट इंजिनीअर टेलिकम्युनिकेशन (Assistant Engineer Telecommunication),
असिस्टंट इंजिनीअर सिव्हिल(Assistant Engineer Civil) ही पदे भरली जाणार आहेत.

या विविध पदांसाठी एकूण 223 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करण्यासाठी आमंत्रित केले आहे.

सहाय्यक अभियंता ट्रान्समिशनच्या पदासाठी अर्ज करणार्‍या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा शैक्षणिक संस्थेतून इलेक्ट्रिकल इंजिनीअरची पदवी असणे आवश्यक आहे.

तसेच उमेदवारास सहाय्यक अभियंता पारेषण पदाचा किमान अनुभव असावा. या पदासाठी निवडलेल्या उमेदवारांना 80,962 रु. प्रति महिना वेतन दिले जाईल.

Mahatransco Recruitment 2022 भरती अधिसूचना पाहण्यासाठी येथे क्लिक करा

सहाय्यक अभियंता दूरसंचार या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा शैक्षणिक संस्थेतून BE इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनपर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेले असावे.

उमेदवारास सहाय्यक अभियंता दूरसंचार पदाचा किमान अनुभव देखील असावा. या पदासाठी निवडलेल्या उमेदवारांना 80,962 रु. प्रति महिना वेतन दिले जाईल.

सहाय्यक अभियंता सिव्हिल पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा शैक्षणिक संस्थेतून सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेले असावे.

तसेच उमेदवारास सहाय्यक अभियंता स्थापत्य पदाचा किमान अनुभव असावा. या पदासाठी निवडलेल्या उमेदवारांना 80,962 रु. प्रति महिना वेतन दिले जाईल.

पदासाठी अर्ज करताना उमेदवारांनी त्यांचा बायोडाटा, 10वी, 12वी आणि शैक्षणिक प्रमाणपत्रे, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचे प्रमाणपत्र (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधार कार्ड, लायसन्स) आणि पासपोर्ट आकाराचा फोटो जोडावा.

या पदासाठी राखीव प्रवर्गातील उमेदवारांना सरकारी नियमांनुसार भरती आणि वयोमर्यादेच्या बाबतीत सवलत दिली जाईल. याबाबतचा तपशील अधिसूचनेत देण्यात आला आहे.

अधिकृत वेबसाइटला भेट देऊन उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतील. 24 मे 2022 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी. अर्जात काही त्रुटी राहिल्यास किंवा दिलेल्या वेळेनंतर प्राप्त झाल्यास अर्ज नाकारला जाईल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा