Maharashtra State Cooperative Bank MSC Bank Recruitment 2022 : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी नोकरभरती, पूर्ण डिटेल जाणून घ्या !

189
Bank Job 2022: महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेत बंपर भरती

Maharashtra State Cooperative Bank MSC Bank Recruitment 2022 : बँक जॉब (Bank Job 2022) शोधत असलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड (Maharashtra State Cooperative Bank MSC Bank) मध्ये विविध पदे भरली जातील.

यासाठी अधिकृत संकेतस्थळावर अधिसूचना प्रकाशित करण्यात आली असून या पदासाठी आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची अंतिम तारीख या सर्व तपशीलांचा तपशील देण्यात आला आहे.

महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड (Maharashtra State Cooperative Bank MSC Bank) मध्ये प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी आणि प्रशिक्षणार्थी लिपिकांच्या एकूण १९५ जागा भरण्यात येणार आहेत.

अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून उमेदवार त्यांचे अर्ज ऑनलाइन पाठवू शकतील.

प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा शैक्षणिक संस्थेची पदवी असणे आवश्यक आहे.

तसेच उमेदवाराला प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी पदाचा किमान अनुभव असावा. या पदासाठी निवडलेल्या उमेदवारांना रु. 20,000 प्रति महिना वेतन दिले जाईल. उमेदवारांना अर्ज करताना 1,770 रुपये शुल्क भरावे लागेल.

प्रशिक्षणार्थी लिपिक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा शैक्षणिक संस्थेची पदवी असणे आवश्यक आहे.

तसेच उमेदवाराला प्रशिक्षणार्थी लिपिक पदाचा किमान अनुभव असावा. या पदासाठी निवडलेल्या उमेदवारांना रु. 15,000 प्रति महिना वेतन दिले जाईल. उमेदवारांना अर्ज करताना 1,180 शुल्क रुपये भरावे लागेल.

पदासाठी अर्ज करताना उमेदवारांनी त्यांचा बायोडाटा, 10वी, 12वी आणि शैक्षणिक प्रमाणपत्रे, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचे प्रमाणपत्र (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र  (आधारकार्ड, लायसन्स) आणि पासपोर्ट आकाराचा फोटो जोडावा.

या पदासाठी राखीव प्रवर्गातील उमेदवारांना सरकारी नियमांनुसार भरती आणि वयोमर्यादेच्या बाबतीत सवलत दिली जाईल. याबाबतचा तपशील अधिसूचनेत देण्यात आला आहे.

इच्छुक आणि पात्र उमेदवार खाली दिलेल्या थेट लिंकवरून अर्ज करू शकतील. 25 मे 2022 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी. अर्जात काही त्रुटी राहिल्यास किंवा दिलेल्या वेळेनंतर प्राप्त झाल्यास अर्ज नाकारला जाईल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा