Maharashtra Election 2022 : महाराष्ट्रातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. 17 जिल्ह्यातील 92 नगरपालिकांच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत.
ओबीसी राजकीय आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित असल्यानं राज्यातील जनतेचं निवडणुका कधी जाहीर होणार याकडे लक्ष लागलं होतं. अखेर निवडणूक आयोगानं 92 नगरपालिकांची निवडणूक जाहीर केली आहे.
आता18 ऑगस्ट रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडेल आणि त्यानंतर 19 ऑगस्ट रोजी निकाल जाहीर करण्यात येईल. १७ जिल्ह्यातील कमी पाऊस पडणाऱ्या नगरपालिका क्षेत्रांमध्ये निवडणूक पार पडणार आहे.
निवडणुकीची प्रक्रिया 20 जुलैपासून सुरु होणार आहे. 22 ते 28 जुलैपर्यंत राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या संकेतस्थळावर नामनिर्देशनपत्र भरायची आहेत.
छाननी आणि वैध नामनिर्देशन पत्र असलेल्या उमेदवारांची यादी 29 जुलै रोजी जाहिर केली होणार असून 4 ऑगस्टपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. उमेदवारांना प्रचारासाठी 14 दिवसांचा कालावधी मिळणार आहे.
कोणत्या 17 जिल्ह्यात निवडणूका?
ज्या 17 जिल्ह्यात निवडणुका होणार आहेत त्यात पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, अमरावती आणि बुलडाणा यांचा समावेश आहे.
निवडणुकीचा कार्यक्रम
92 नगरपालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम
- जिल्हाधिकारी कार्यक्रम जाहीर करणार : 20 जुलै
- उमेदवारी अर्ज उपलब्ध : 22 ते 28जुलै
- अर्ज स्वीकारण्याचा कालावधी 22 ते 28 जुलै
- अर्जाची छाननी : 29 जुलै
- अर्ज मागे घेण्याची मुदत : 4 ऑगस्ट दुपारी 3 पर्यंत
- उमदेवारी अर्जावरील आक्षेप : 8 ऑगस्ट
- मतदानाचा दिनांक : 18 ऑगस्ट
- मतमोजणी आणि निकाल : 19 ऑगस्ट
जिल्हानिहाय नगरपालिकांची यादी
अ वर्ग नगरपालिका
पुणे : बारामती
सोलापूर : बार्शी
जालना : जालना
बीड : बीड
उस्मानाबाद : उस्मानाबाद
जळगाव : भुसावळ
ब वर्ग नगरपालिका
नाशिक : मनमाड, सिन्नर, येवला
धुळे :दोंडाईचा बरवाडे, शिरपूर वरवाडे
नंदूरबार : शहादा
जळगाव : अमळनेर, चाळीसगाव
अहमदनगर : संगमनेर, कोपरगाव, श्रीरामपूर
पुणे : चाकण, दौंड
सातारा : कराड, फलटण
सागंली : इस्लामपूर, विटा
सोलापूर : अक्कलकोट, पंढरपूर, अकलूज
कोल्हापूर : जयसिंगपूर
औरंगाबाद : कन्नड पैठण
बीड : अंबेजोगाई, माजलगाव, परळी-वैजनाथ
लातूर : अहमदपूर
अमरावती : अंजनगाव सूर्जी
क वर्ग नगरपालिका
नाशिक : चांदवड, नांदगाव, सटाणा, भगूर
जळगाव : वरणगांव, धरणगाव, एंरणडोल, फैजपूर, पारोळा, यावस
अहमदनगर : जामखेड, शेवगाव, देवळाली प्रवरा, पाथर्डी, राहता, राहुरी,
पुणे : राजगुरुनगर, आळंदी, इंदापूर,जेजुरी, सासवड, शिरुर
सातारा : म्हसवड, रहितमपूर, वाई
सांगली : आष्टा, तासगाव, पलूस,
सोलापूर : मोहोळ, दुधनी, करमाळा, कुर्डूवाडी, मंदगी, मंगळवेढा, सांगोला
कोल्हापूर : गडहिंग्लज, कागल, कुरुंदवाड, मुरगूड, वडगाव
औरंगाबाद : गंगापूर, खुल्ताबाद,
जालना: अंबड, भोकरदन, परतूर
बीड : गेवराई, किल्ले धारुर
उस्मानाबाद : भूम, कळंब, मुरुम, नळदूर्ग, उमरगा, परंडा, तुळजापूर
लातूर : औसा, निलंगा,
अमरावती : दर्यापूर
बुलडाणा : देऊळगाव राजा
नगरपंचायत निवडणूक
अहमदनगर : नेवासा
पुणे : मंचर, माळेगाव बुद्रुक
सोलापूर : अनगर