लाऊडस्पीकरचा वाद : राजस्थानमध्ये दोन गटात तुंबळ हाणामारी; अनिश्चित काळासाठी इंटरनेट सेवा बंद

Loudspeaker dispute: Two groups clash in Rajasthan; Internet service closed indefinitely

जोधपूर : महाराष्ट्रात एकीकडे भोंग्यांवरून राजकारण सुरु आहे. तर तिकडे राजस्थानमधेही याचे लोन पोहोचल्याचे समोर आले आहे.  कारण राजस्थानच्या जोधपूरमध्ये  ईदच्या पूर्वसंध्येला जालोरी गेटवर ध्वज आणि लाऊडस्पीकर लावण्यावरून दोन गटांमध्ये तुफान दगडफेक झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर जोधपूरमध्ये अनिश्चित काळासाठी इंटरनेट सेवा बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

जोधपूर शहरात रात्री उशिरा लाऊडस्पीकर आणि झेंडे हटवण्यावरून वाद झाला होता. शहरातील जालोरी गेट चौकातील लाऊडस्पीकर व धार्मिक ध्वज हटवण्यावरून रात्री ११.३० वाजता दोन्ही पक्षांमध्ये वाद झाला. दरम्यान, या वादाचे रूपांतर दगडफेकीत झाले.

Jodhpur: झंडे और लाउडस्पीकर लगाने पर बवाल, पुलिस ने किया लाठी चार्ज और  छोड़े आंसू गैस के गोले - Jodhpur on the eve of Eid a fight broke out over  flags and
जोधपूर शहरात रात्री उशिरा लाऊडस्पीकर आणि झेंडे हटवण्यावरून वाद झाला.

जालोरी गेट चौकाच्या दोन्ही टोकापासून दगडफेक सुरू झाली. त्यानंतर जोधपूर पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात करून प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला. दोन्ही बाजूंच्या दगडफेकीत पोलिस उपायुक्त, एसएचओ यांच्यासह अनेक जण जखमी झाले. अर्ध्या तासाच्या दगडफेकीनंतर पोलिसांनी लाठीमार केला आणि अश्रुधुराच्या नळकांड्याही सोडल्या.

एका इंग्रजी वर्तमानपत्रानुसार, जालोरी गेट चौकात हिंदू ध्वज काढून मुस्लिम ध्वज लावण्यावरून वाद सुरू झाला. जालोरी सर्कलजवळ बॅनरही लावण्यात आले तसेच लाऊडस्पीकर लावण्यात आला आहे.

स्वातंत्र्यसैनिक बाल मुकुंद बिस्सा यांच्या पुतळ्यावर ध्वज आणि ईदशी संबंधित बॅनर लावण्यात आल्यानंतर एका समुदायाच्या लोकांनी घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. त्याचेच रूपांतर पुन्हा दगडफेकीत झाली. या सर्व प्रकारादरम्यान जोधपूरचे जिल्हाधिकारी हिमांशू गुप्ता यांनी जोधपूरमधील इंटरनेट सेवा अनिश्चित काळासाठी बंद करण्याचे आदेश जारी केले आहेत.