अहमदनगर : राज्यात गोवंश कत्तलीवर बंदी असतानाही कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक सुरूच आहे. नुकतेच कोपरगाव ग्रामीण पोलिस ठाण्याच्या पथकाने बुधवारी रात्री साडेसातच्या सुमारास नगर-मनमाड महामार्गावरील येसगाव शिवारातील प्रियंका हॉटेलसमोर कत्तलीसाठी जनावरे घेऊन जाणाऱ्या एका व्यक्तीला पाठलाग करून पकडले.
याप्रकरणी बबलू इद्दू शेख (22, बारागाव, नांदूर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पिकअप व्हॅन (MH43F9443) कोपरगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पथकाने जनावरांसह कत्तलीसाठी जाणाऱ्या व्यक्तीला पाठलाग करून पकडले.
याप्रकरणी बबलू इद्दू शेख (वय 22, रा. बारागाव नांदूर हल्ली मुक्काम का) याच्याविरुद्ध कोपरगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईत पोलिसांनी एकूण 40 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार आंधळे पुढील तपास करीत आहेत.
पोलीस हवालदार प्रकाश सुरेश नवली यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बबलू शेख याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे 8 जनावरे वाचली आहेत.