राजू श्रीवास्तव यांची प्रकृती खालावली, डॉक्टरांचे प्रयत्न आणि मित्रांच्या प्रार्थना सुरु

Raju Srivastava's health deteriorated, doctors' efforts and friends' prayers began

Raju Srivastava’s health Update : राजू श्रीवास्तव यांची प्रकृती चिंताजनक आहे. राजूच्या आरोग्यासाठी प्रार्थनाच कामी येईल, असे उत्तर डॉक्टरांनीही दिल्याचे बोलले जात आहे. अशा परिस्थितीत राजू श्रीवास्तव यांच्या जीवनाशी संबंधित त्यांचे अनेक वैयक्तिक आणि व्यावसायिक मित्र व हितचिंतक अंधेरी पश्चिम येथे एकत्र बसून प्रार्थना करीत आहेत.

या मित्रांमध्ये कॉमेडियन एहसान कुरेशी, अशोक मिश्रा आणि त्यांचे बिझनेस मॅनेजर राजेश शर्मा यांचा समावेश आहे. एम्समध्ये राजूच्या अॅडमिशन वेळी राजेश शर्मा 6 दिवस दिल्लीत होते. आजही हे मित्र रात्री उशिरा दिल्लीला जाण्याच्या प्लॅनमध्ये आहेत.

राजू आयसीयूमध्ये दाखल

राजू श्रीवास्तव यांना एम्सच्या कार्डिओलॉजी न्यूरो सायन्स बिल्डिंगच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. राजूच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे की तो लढवय्या असून तो परतणार आहे.

मात्र, राजू श्रीवास्तव अजूनही व्हेंटिलेटरवर आहेत. गेल्या आठ दिवसांत राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीत फारशी सुधारणा झालेली नाही.

एहसानला शेवटची भेट आठवली

आज तक सोबत बोलताना एहसान कुरेशी म्हणाले कि, मी त्याला ओशिवरा पोलीस स्टेशनच्या समोरील ऑफिसमध्ये शेवटच्या वेळी भेटलो होतो. मॅरीगोल्ड बिल्डिंगमध्ये त्यांचे कार्यालय आहे.

जेव्हा तो लखनौला यायचा तेव्हा मित्रांसोबत कॉफी प्यायचा. मी, सुनील पाल यांनी मिळून त्यांच्याकडून चित्रपटांच्या अनुदानासाठी अर्ज कसा करायचा याची माहिती घेतली. आमच्यात अनेकदा असे संवाद व्हायचे.

एहसान पुढे सांगतो, त्याच्या मुलीचे लग्न होणार आहे, मुलगा लहान आहे. फक्त ईश्वर त्याला या संकटातून बाहेर काढावे, यासाठी आम्ही मित्र मिळून ही प्रार्थना करत आहोत.

ज्या माणसाने जगाला इतकं हसवलं आहे, संपूर्ण जगही त्याच्या आरोग्याची वाट पाहत आहे. आम्ही सर्व काळजीत आहोत आणि संध्याकाळपर्यंत दिल्लीला पोहोचण्याच्या तयारीत आहोत. राजू भाऊ बरे व्हा आणि परत या!

राजूची तब्येत कशी आहे?

राजू श्रीवास्तव यांचे मुख्य सल्लागार अजित सक्सेना यांनी सांगितले की, आज सकाळी डॉक्टरांनी राजूचा मेंदू काम करत नसल्याची माहिती दिली आहे. तो जवळजवळ मृतवत आहे. हृदयाचा त्रासही होत आहे.

आम्ही सर्व परेशान आहोत. सर्वजण देवाची प्रार्थना करत आहेत. घरातील सदस्यांनाही काही समजत नाही. आमची इच्छा आहे, राजू लवकर बरा व्हावा आणि सकारात्मक प्रतिसाद मिळावा हीचं देवाकडे प्रार्थना आहे.