Hyderabad Gangrape: हैदराबादमध्ये नुकताच अल्पवयीन मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणात मोठा खुलासा समोर आला आहे.
प्राथमिक पुराव्यांवरून असे आढळून आले आहे की, सामूहिक बलात्काराचा कट शिजला गेला होता.
म्हणजेच हे संपूर्ण प्रकरण पूर्वनियोजित होते आणि ही घटना घडवून आणण्यासाठी बरीच तयारी आधीच करण्यात आली होती.
जसे आरोपींनी कंडोमही विकत घेतले होते. तसेच रविवारी, आरोपींनी जबाबादरम्यान पीडिता ‘मैत्रीण’ असल्याचे सांगितले आणि त्याने तिच्या ‘मैत्रीचा’ फायदा घेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची कबुली दिली.
कंडोम वापरला होता
टाइम्स ऑफ इंडियाच्या काही रिपोर्ट्समध्ये असे सांगण्यात आले आहे की, एका पोलीस अधिकाऱ्याने TOI शी बोलताना सांगितले की, 4 अल्पवयीन आणि 1 प्रौढ व्यक्तीद्वारे अल्पवयीन मुलीवर बलात्काराची घटना पूर्वनियोजित आखली होती.
कारण हे कृत्य करताना या आरोपींनी संरक्षणाचा वापर केला होता. आरोपींच्या चौकशीदरम्यान त्यांनी आधीच कंडोम आणले होते, तर ते कुठून आणले याचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.
गुन्हा करण्यासाठी बेकरी आणि नंतर रोड क्रमांक 44 वर जाताना खरेदी केले होते का याचा पोलीस तपास करत आहेत.
“अल्पवयीन मुलीवर प्रथम कोणी बलात्कार केला किंवा कोणाच्या चिथावणीवर ही घटना घडली, हे महत्वाचे नसून सर्व मुले या गुन्ह्यात सामील होती,” असे अधिकारी म्हणाले.
रविवारी घडलेल्या घटनेची अधिक माहिती मिळविण्यासाठी पोलिसांनी सर्व 6 आरोपींना घटनास्थळीच्या ठिकाणी नेले आणि क्राईम सीन रिक्रिएट केला.
पोलिसांनी सर्व आरोपींना ज्युबली हिल्स रोड क्रमांक 44 वर नेले जेणेकरून घटना क्रमानुसार आणि गुन्हा कसा घडला हे समजू शकेल.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
हैदराबादमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे.
याबाबत असा दावा केला जात आहे की, ही तरुणी एका पार्टीत सहभागी होण्यासाठी तिच्या मित्रांसोबत पबमध्ये गेली होती.
तिथून परतत असताना तिच्याच मित्रांनी आलिशान कारमध्ये तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.
सामूहिक बलात्काराच्या 6 पैकी 4 आरोपी अल्पवयीन असल्याचे सांगण्यात येत आहे.
या प्रकरणाच्या तळापर्यंत जाण्यासाठी पोलीस छोट्या छोट्या गोष्टींवर विशेष लक्ष देत आहेत.