मशिदींवरील भोंगे उतविण्याने हिंदुत्वाचे सर्वाधिक नुकसान होईल : ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे

Hindutva will suffer the most by raising horns on mosques: President of Brahmin Federation Anand Dave

पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS president Raj Thackeray) यांनी राज्यातील मशिदींतील स्पीकर काढण्यासाठी 3 मे पर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. याचा उल्लेख राज ठाकरे यांनी औरंगाबादच्या आजच्या सभेत केला असून 4 तारखेपासून ते ऐकून घेणार नसल्याचा इशारा राज्य सरकारला दिला आहे.

ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी राज ठाकरेंच्या भूमिकेवर भाष्य केले आहे. आनंद दवे यांनी मशिदींवरील शिंग वाढवल्यास हिंदुत्वाचे सर्वात मोठे नुकसान होईल, अशी स्पष्ट भूमिका ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे (Anand Dave, President of Brahmin Federation) यांनी घेतली आहे.

आनंद दवे नेमके काय म्हणाले?

आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या काळातही भोंगे काढणे शक्य झाले नाही. भोंगे काढल्याचा फटका हिंदुनां सर्वाधिक. प्रत्येक जयंती, यात्रा, पाडवा, दिवाळी, दहीहंडी, नवरात्र सगळेच अडचणीत येतील, असे आनंद दवे म्हणाले.

रस्त्यावर नमाज अदा करणे चुकीचे आहे, मग गणपतीचे मांडव, उत्सवाच्या मांडवात होणार्‍या आरत्याही रस्त्यावरच होत आहेत. मिरवणूक, दांडिया यांचे काय करणार? असा सवाल केला आहे.

राज ठाकरे भोंग्याबद्दल काय म्हणाले?

“आज १ तारिख आहे, ३ तारखेला ईद आहे, मला कोणत्याही सणावर विष कालवायचे नाही. त्यानंतर 4 तारखेपासून मी महाराष्ट्रात ऐकणार नाही. आज नाही तर पुन्हा कधीच नाही. या लोकांनी ऐकले नाही तर 3 तारखेपासून पोलिसांची परवानगी घ्या आणि मेहनत करा हा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढावा, असे राज ठाकरे म्हणाले.

राज ठाकरेंच्या इशाऱ्याला गृहराज्यमंत्री वळसे पाटील यांची महत्त्वाची प्रतिक्रिया

दरम्यान, राज्याचे गृहराज्यमंत्री दिलीप वळसे पाटील यांनीही राज ठाकरेंच्या इशाऱ्याला महत्त्वाची प्रतिक्रिया दिली. ‘राज्यात भोंगे महत्त्वाचा नाही, सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने सर्व विषय हाताळत आहोत. मशिदीवरील भोंगे काढल्यावर तुमच्या मंदिरांचे व उत्सवांचे काय? असा खडा सवाल उपस्थित करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबादेत झालेल्या सभेवर राज्याचे गृहराज्यमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट शब्दात प्रतिक्रिया दिली.

‘राज्यात राजकारण केले जात आहे. भोंगा महत्त्वाचा नसून भोंग्यामुळेच राज्यात हिंदू-मुस्लिम वाद वाढवण्याचा प्रयत्न होत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मशिदीवरील भोंगे हटवल्यास तुमच्या देवाच्या कार्यक्रमांचे काय होणार, असा सवाल करत वळसे पाटील यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला.

‘आता जर दुसऱ्याची खपली काढायला गेलो तर आपल्याच अंगावर येणार आहे. अरे…बाबा..हनुमान चालीसा हिंदीत आहे वाचायचीच असेल हनुमान स्त्रोत्र वाचा. असा खोचक टोलाही गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी राज ठाकरे यांना लगावला.