प्रशांत किशोर राजकीय पक्ष स्थापन करणार? नव्या ट्विटमुळे खळबळ

70
Will Prashant Kishor form a political party? Excitement over a new tweet

नवी दिल्ली : निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर (Election strategist Prashant Kishor) यांची काँग्रेससोबतची चर्चा फसली. त्यानंतरही किशोरच्या भविष्याबाबत गूढ कायम आहे.

त्यांनी आज (दि.२) सोमवारी एक ट्विट केले. लोकशाहीच्या खऱ्या समस्या समजून घेण्यासाठी आता खऱ्या लोकांकडे वळणार असून त्याची सुरुवात बिहारपासून करणार असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे आता प्रशांत किशोर राजकीय पक्ष काढणार का? अशी चर्चा रंगतदार असते.

>> मशिदींवरील भोंगे उतविण्याने हिंदुत्वाचे सर्वाधिक नुकसान होईल : ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे

मी 10 वर्षे लोकशाहीत सहभागी होण्यासाठी आणि लोकाभिमुख धोरणे तयार करण्यात मदत केली आहे. पण, लोकशाही-सुशासन समजून घेण्याची खऱ्या नायकाकडे म्हणजेच जनतेकडे जाण्याची हीच वेळ आहे. त्याची सुरुवात बिहारपासून होईल, असे ट्विट प्रशांत किशोर यांनी केले आहे.

मी निवडणुकीत भाग घेणार आहे. मात्र, ते पूर्वीसारखे राहिले नसल्याचे त्यांनी याआधी सांगितले होते. कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश करणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आजच्या ट्विटनंतर प्रशांत किशोर खरोखरच राजकीय पक्ष काढतील का? अशा चर्चा रंगत आहेत. मात्र, प्रशांत किशोर कोणत्या पक्षात जाणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

बंगालच्या निवडणुकीनंतर मी म्हणालो होतो की, मी माझ्या क्षमतेनुसार कोणत्याही पक्षासाठी काम करणार नाही. पण, गोव्याच्या निवडणुकीसाठी काम केले. याचा अर्थ मी कोणत्याही निवडणुकीत उतरणार नाही असे नाही; असे प्रशांत किशोर यांनी बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

RECENT POSTS