Ganesh Chaturthi 2022 : बाप्पाचे आगमन उद्या होणार, शुभ मुहूर्त आणि पूजाविधी 

Ganesh Chaturthi 2022

Ganesh Chaturthi 2022 : ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष करत उद्या दि.31 रोजी गणरायाचे आगमन होत आहे. कोरोना संकटातून सावरल्यावर शहरातील विविध भागात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये आणि घरोघरी गणपती प्रतिष्ठापना होणार आहे.

गणेशोत्सवामुळे शहरात उत्साहाचे वातावरण आहे. गणेशोत्सवानिमित्त शहरातील विविध सार्वजनिक मंडळांमध्ये देखावे तयार करण्यात येत असून त्याला अंतिम स्पर्श करण्यात येत आहे.

Ganesh Chaturthi 2022 : गणेश चतुर्थीच्या पूजेत 5 गोष्टींचा समावेश करू नये

तसेच घरोघरी गणरायाच्या आगमनाची जय्यत तयारी सुरू आहे. लालबाच्या राजाची पहिली झलक मुंबईत पाहायला मिळाली. शहरासह शहराबाहेर ढोल-ताशांच्या दणदणाटात गणेशमूर्ती मंडपाकडे नेण्यात येत आहेत.

बाप्पाच्या आगमनाची आज जय्यत तयारी सुरू असून शहरात विविध भागात मूर्ती विक्रीचे शेकडो स्टॉल्स लावण्यात आले आहेत. पूजेच्या तयारीसाठी लागणारे साहित्य, तसेच मूर्ती खरेदी करण्यासाठी सर्वच बाजारपेठेत गर्दी दिसून येत आहे.

याप्रमाणे पूजेची तयारी करा

गणेशाची छोटी मूर्ती, श्रीफळ, कापड, कापसाच्या माळा, हार, सुट्टीची फुले व नाणी, अत्तर, गूळ-नारळ, सुपारी, देठाची पाने, मिठाई, मोदक, सुती कापड, अगरबत्ती, कापूर, दुर्वा, हळद-कुंकू-अबीर. – गुलाल, दिवा, तेल, समई, वटी, फळे, पंचामृत, नैवेद्य, चंदन, अष्टगंध, पाळी, पंचपत्र, जानवे, शमीची पाने, आंब्याची फांदी, ताम्हण, कलश, शंख, बेल, अक्षता इ.

शुभ मुहूर्त

  1. गणेश चतुर्थी: बुधवार, 31 ऑगस्ट 2022
  2. गणपती मूर्ती स्थापनेचा मुहूर्त : 31 ऑगस्ट रोजी सकाळी 11.5 ते दुपारी 1.38 स्थापन करता येईल.
  3. चंद्र दर्शन टाळणे : 30 ऑगस्ट दुपारी 03:33 ते रात्री 08:40 पर्यंत आहे.
  4. गणेश विसर्जन तारीख: शुक्रवार, 9 सप्टेंबर 2022

गणपती प्रतिष्ठापना विधी

  1. प्रथम कपाळाला गंध लावून आचमन करावे.
  2.  देवापुढे देवापुढे विड्याचे पान त्यावर नाणे आणि सुपारी ठेवावी.
  3.  देवास नमस्कार करून वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घ्यावेत आणि पुजेला प्रारंभ करावा.
  4.  आसनावर बसावे.
  5.  हातात अक्षता घेऊन श्रीगणेशाचे मनात स्मरण करावे.
  6.  अक्षता श्रीगणेशाच्या पायांवर वाहाव्यात.
  7.  उजव्या हातात दोन पळ्या पाणी घेऊन त्यात गंध, अक्षता, फुले घेऊन मंत्रोच्चार करावा.
  8.  श्रीगणेशाचे स्मरण करून कलश, शंख, घंटा, दिवा, समई यांची पूजा करावी गंध, अक्षता, फुले, हळद कुंकू वहावे.
  9.  नमस्कार करून उजवा हात मूर्ती वर ठेवावा डावा हात स्वतःच्या हृदयास स्पर्श करून श्रीगणेशाचे ध्यान करावे.
  10.  गणेशाच्या चरणांवर दुर्वा किंवा फुलाने पाणी शिंपडावे.
  11.  गणपतीच्या चरणांवर गंध फुल अक्षता यांनी युक्त पाणी वाहावे.
  12.  ताम्हणात 4 वेळा पाणी सोडावे.
  13.  गणेशाच्या मूर्तीवर पाणी शिंपडावे, चरणांवर पंचामृत वहावे, अक्षता वाहाव्यात.
  14.  गंध लावावे, हळद, शेंदूर, फुले,हार, कंठी, दुर्वा वाहाव्यात.
  15.  प्रत्येक अवयवांवर अक्षता वाहाव्यात, विविध पत्री अर्पण कराव्यात.
  16.  धूप, अगरबत्ती ओवाळावी. दीप, निरांजन ओवाळावे.
  17.  नैवेद्य, प्रसाद अर्पण करावा. विडा अर्पण करावा.
  18.  विड्यावर दक्षिणा ठेवावी, समोरील नारळावर पळीभर पाणी सोडावे आणि त्यावर एक फुल वाहावे.
  19.  आरती करावी, स्वतः भोवती प्रदक्षिणा घालावी.
  20.  श्री गणेशास नमस्कार करावा, प्रार्थना करावी, एक पळीभर पाणी ताम्हणात सोडावे.

हे देखील वाचा