Amruta Fadnavis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्याने नेहमीच महाराष्ट्राचे लक्ष वेधले आहे. त्यांच्या अनेक वक्तव्यांमुळे त्या सोशल मीडियावर ट्रोल झाल्या आहेत.
पण मी कोणाला घाबरत नाही. सामान्य नागरिक माझ्यावर टीका करत नाहीत. विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर देणं मला महत्त्वाचं वाटत नाही, असं म्हणत अमृता फडणवीस यांनी आयुष्यात सर्वात जास्त कोणाची भीती वाटते, याचा खुलासा केला आहे. आपल्या देशात दोन राष्ट्रपिता आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे.
मंगळवारी नागपुरात अभिरूप न्यायालय पार पडले, यावेळी अमृता फडणवीस यांनी संघात माझ्याबद्दल तक्रार केल्याचे सांगितले. त्यांनी म्हटले, मला राजकारण आवडत नाही. मलाही रस नाही. त्यामुळे मी फार कमी राजकीय बाबींवर मत देते.
आपल्या देशाला दोन राष्ट्रपिता आहेत. महात्मा गांधी हे जुन्या भारताचे राष्ट्रपिता आणि नरेंद्र मोदी हे नव्या भारताचे राष्ट्रपिता आहेत; असे अमृता यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना धाडसी विधान केले आहे.
अमृता फडणवीस या दोघांना खूप घाबरतात
राजकारणासाठी 24 तास काम करणाऱ्या आणि जनतेसाठी पूर्ण वेळ देणाऱ्यांनी मुख्यमंत्री व्हायला हवे. मला कोणतेही विधान केल्यावर घाबरत नाही.
कारण मला भीती वाटते फक्त माझी आई आणि सासू या दोघाची, मी इतर कुणाला घाबरत नाही, असे अमृता फडणवीस यांनी सांगितले.