MIM च्या माजी जिल्हा अध्यक्षास HDFC बँकेत नकली नोटा भरल्याप्रकरणी अटक

212
Former MIM district president arrested for filling fake notes in HDFC Bank

बुलढाणा : बुलढाणा येथील मलकापूर एचडीएफसी बँकेत 23 फेब्रुवारी रोजी एका व्यापाऱ्याने 500 रुपयांच्या 38 नोटा जमा केल्या होत्या.त्यावेळी बँकेच्या रोखपालाने मलकापूर पोलिसात तक्रार दाखल केली होती.

पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे. पोलिसांनी आतापर्यंत विविध ठिकाणांहून एकूण ६ जणांना अटक केली आहे.

या सर्वांची चौकशी केल्यानंतर आज मलकापूर पोलिसांनी बुलढाणा जिल्ह्यातील एमआयएमच्या माजी जिल्हाध्यक्षाला अटक केली.

Business Idea : तुम्हाला दर महिन्याला लाखात कमवायचे असेल तर हा व्यवसाय फक्त 15,000 रुपयांमध्ये सुरू करा, जाणून घ्या सुरुवात कशी करावी

त्याचे सैजाद खान सलीम खान असे नाव असून आपल्या राजकीय पदाचा वापर करून त्याने मलकापूर परिसरात अवैध बायोडिझेलचे मोठे जाळे उभारले आहे.

एमआयएमचे माजी अध्यक्ष सैजाद खान यांना आज अटक केल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली असून या प्रकरणात मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

न्यायालयाने सैजाद खानला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

RECENT POSTS