Crime News : जालन्यात पोलिस कर्मचाऱ्याकडून महिला पोलिस कर्मचारी असलेल्या तरुणीवर ३ वर्षे बलात्कार

Crime News

जालना : लव्ह, सेक्स आणि धोक्याचे अनेक प्रकार तुम्ही पाहिले असतील. मात्र, जालना येथे महिला पोलीस कर्मचारी असलेल्या तरुणीवर पोलीस कर्मचार्‍याने 3 वर्ष बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

इतकेच नव्हे तर सदरील पोलीस अधिकाऱ्याचे महिला पोलीस कर्मचारी असलेल्या प्रेयसीसोबत प्रेमसंबंध होते, त्यातून त्याने तिच्यावर बलात्कार करून लैंगिक अत्याचार केला आणि त्याच दरम्यान दुसऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंधातून त्याने  दुसऱ्या तरुणीशी घरोबा केल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.

यवतमाळ : प्राध्यापक पतीकडून पत्नीच्या गुप्तांगावर धारदार चाकूने वार करून निर्घृण हत्या

पुणे राज्य राखीव पोलीस दलात कार्यरत असलेल्या पोलीस हवालदार पंकज मगर याने जालना जिल्हा कारागृहात कार्यरत असलेल्या महिला पोलीस अधिकाऱ्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि तिच्यावर अनेकदा बलात्कार केला.

मूळचा वर्धा जिल्ह्यातील रहिवासी असलेला पंकज आणि पीडित महिला पोलीस अधिकारी दोघेही वेगवेगळ्या जिल्ह्यातील आहेत. भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रात झालेल्या मैत्रीतून हळूहळू दोघांची मैत्री वाढत गेल्याने दोघांमधील मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले.

प्रशिक्षण घेत असतानाच पीडित तरुणी जालना जिल्हा कारागृहात पोलीस अधिकारी म्हणून रुजू झाली. त्यानंतर आरोपी पंकज हा पुणे येथील राज्य राखीव पोलिस दलाच्या गट क्रमांक दोनमध्ये रुजू झाला.

त्यानंतर आरोपी पंकजने पीडित महिला पोलीस अधिकाऱ्यासोबत तिच्या शासकीय निवासस्थानी जाऊन 2018 ते 2022 या काळात तिच्यावर अनेकदा बलात्कार केला.

दरम्यान, पीडित महिला पोलीस अधिकाऱ्याने लग्नाची मागणी केल्यावर पंकज वारंवार टाळून लग्नापासून पळ काढत होता. तेव्हा पिडीतेला संशय येऊ लागला, तेव्हा तिने त्याची माहिती काढली असता डिसेंबर 2021 मध्ये दुसऱ्या मुलीशी लग्न केल्याची धक्कादायक माहिती समोर आली.

यवतमाळ : प्राध्यापक पतीकडून पत्नीच्या गुप्तांगावर धारदार चाकूने वार करून निर्घृण हत्या

आपली झालेली फसवणूक लक्षात आल्यावर महिला पोलिस कर्मचाऱ्यांने पोलिस ठाण्यात धाव घेत पंकजविरोधात तक्रार दाखल केली.

पीडितेच्या तक्रारीनुसार तालुका पोलिसांनी पंकज मगर याच्याविरुद्ध पोलिस ठाण्यात अॅट्रॉसिटी कायद्यान्वये बलात्कार, लग्नाच्या नावाखाली फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

RECENT POSTS