Devendra Fadnavis Ministry: उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्याने महाविकास आघाडीचे सरकार कोसळले.
त्यानंतर आज रात्री किंवा उद्या देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना मंत्रीपद मिळणार का? अशी चर्चा पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे.
पंकजा मुंडेंना प्रत्येक वेळी त्रास दिल्याचा फडणवीसांवर आरोप होतो. त्यामुळे यावेळी मुंडे यांना संधी मिळेल, अशी अपेक्षा त्यांच्या समर्थकांना आहे.
कार्यकर्त्यांच्या अपेक्षा वाढल्या
विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा पराभव झाला. त्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार आल्याने भाजपला विरोधी पक्षात सामील होण्याची वेळ आली.
मात्र त्यानंतरही पंकजा मुंडे यांना विधान परिषदेत संधी मिळणार असल्याचे बोलले जात होते पण ऐनवेळी त्यांचे नाव बाजूला सारले गेले. त्यामुळे पंकजा मुंडे समर्थकांनी फडणवीस यांच्यावर शिवराळ टीका देखील केली आहे.
त्यामुळे अडीच वर्षानंतर पुन्हा एकदा भाजपचे सरकार स्थापन होत असून फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार आहेत. त्यामुळे यावेळी पंकजा यांना संधी दिली जाईल, अशी मुंडे समर्थकांची अपेक्षा आहे. मात्र, नव्या मंत्रिमंडळाच्या संभाव्य यादीत पंकजा मुंडे यांच्या नावाचा उल्लेख नाही.
देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळाची संभाव्य यादी
कॅबिनेट
देवेंद्र फडणवीस
चंद्रकात पाटील
सुधीर मुनगंटीवार
गिरीश महाजन
आशिष शेलार
प्रवीण दरेकर
प्रसाद लाड
रवींद्र चव्हाण
चंद्रशेखर बावनकुळे
विजयकुमार देशमुख किंवा सुभाष देशमुख
गणेश नाईक
राधाकृष्ण विखे पाटील
संभाजी पाटील निलंगेकर
राणा जगजितसिंह पाटील
संजय कुटे
डॉ. अशोक उईके/ विजयकुमार गावित
सुरेश खाडे
जयकुमार रावल
अतुल सावे
देवयानी फरांदे
रणधीर सावरकर
जयकुमार गोरे
विनय कोरे, जनसुराज्य
परिणय फुके
राम शिंदे किंवा गोपिचंद पडळकर
हे राज्यमंत्री होण्याची शक्यता
नितेश राणे
प्रशांत ठाकूर
मदन येरावार
महेश लांडगे किंवा राहुल कुल
निलय नाईक
गोपीचंद पडळकर
शिंदे गटाकडून यांची नावे चर्चेत
कॅबिनेट मंत्री
एकनाथ शिंदे
गुलाबराव पाटील
उदय सामंत
दादा भुसे
अब्दुल सत्तार
शंभूराज देसाई
बच्चू कडू
तानाजी सावंत
दीपक केसरकर
राज्यमंत्री
संदीपान भुमरे
संजय शिरसाट
भरत गोगावले