देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री, असे असेल फडणवीसांचे संभाव्य मंत्रीमंडळ

Eknath Shinde: Devendra Fadnavis arrives in Delhi, new Maharashtra government coming soon

Maharashtra Political Crisis : 36 दिवसात बनलेले तीन पक्षांचं सरकार अडीच वर्ष चाललं आणि नऊ दिवसात कोसळलं!

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सोपवला आणि महाराष्ट्रातलं महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं.

त्यानंतर महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी भाजपच्या पडद्याआडून हालचाली सुरू झाल्या आहेत. भाजप आणि एकनाथ शिंदे गटामध्ये संभाव्य मंत्रिमंडळाबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.

यामध्ये भाजपच्या कोट्यात 18 कॅबिनेट आणि 10 राज्यमंत्री पदासह 28 मंत्री असणार आहे. तर, शिंदे गटाला 6 कॅबिनेट आणि सहा राज्यमंत्री पद देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

भाजप आणि एकनाथ शिंदे गटात झालेल्या चर्चेनुसार, दर 6 आमदारांमागदे एक कॅबिनेट आणि राज्यमंत्रीप पद दिले जाऊ शकते. मात्र, खाते वाटपाचे हे सूत्र अंतिम झाले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सहा आमदारांमागे एक मंत्री या सूत्रानुसार भाजपला फायदा होणार आहे. भाजपकडे या सूत्रानुसार 28  मंत्रीपदे मिळणार आहेत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री असल्याची माहिती समोर येत आहे.

कॅबिनेट मंत्री

देवेंद्र फडणवीस

चंद्रकात पाटील

सुधीर मुनगंटीवार

गिरीश महाजन

आशिष शेलार

प्रवीण दरेकर

प्रसाद लाड

मंगलप्रभात लोढा

रवींद्र चव्हाण

चंद्रशेखर बावनकुळे

विजयकुमार देशमुख किंवा सुभाष देशमुख

गणेश नाईक

राधाकृष्ण विखे पाटील

संभाजी पाटील निलंगेकर

राणा जगजितसिंह पाटील

संजय कुटे

डॉ. अशोक उईके/ विजयकुमार गावित

सुरेश खाडे

जयकुमार रावल

अतुल सावे

देवयानी फरांदे

रणधीर सावरकर

जयकुमार गोरे

विनय कोरे, जनसुराज्य

परिणय फुके

हे राज्यमंत्री होण्याची शक्यता 

नितेश राणे

प्रशांत ठाकूर

मदन येरावार

महेश लांडगे किंवा राहुल कुल

निलय नाईक

गोपीचंद पडळकर

एकनाथ शिंदे गटाकडून यांची नावे असू शकतात

कॅबिनेट मंत्री

एकनाथ शिंदे

गुलाबराव पाटील

उदय सामंत

दादा भुसे

अब्दुल सत्तार

संजय राठोड

शंभूराज देसाई

बच्चू कडू

तानाजी सावंत

दीपक केसरकर

>> राज्यमंत्री

संदीपान भूमरे

संजय शिरसाट

भरत गोगावले