Crime News : नागपूर | पत्नी निघून गेली आणि घरात पाहुणी म्हणून आलेल्या पुतणीवर जीव जडला. त्यानंतर जे घडले तर अतिशय भयंकर घडले. त्यांचे नाते सामाजिक व नैतिकद्रष्ट्यामान्य नव्हते. त्यामुळे दोघांनीही ट्रेनखाली उडी मारून जीव दिला.
दोन्ही मृतदेह नागपूर-मुंबई रेल्वे मार्गावर आढळून आले. या जोडप्याने आत्महत्या केली असा निष्कर्ष आता हिंगणा पोलिसांनी काढला आहे.
मानकापूर येथील बाबा फरीदनगर येथील मयत जितेंद्र कांशीराम नेवारे (वय 32 वर्षे) प्रियंका (वय 18) (नाव बदलले आहे) गोंदिया जिल्ह्यातील रहिवाशी आहेत.
विशेष म्हणजे जितेंद्र हा विवाहित आहे. वर्षभरापूर्वी त्याची पत्नी त्याला सोडून गेली. त्यामुळे तो आईसोबत एकटाच राहत होता. प्रियंका नात्यातील पुतणी घरी राहायला आली होती.
धक्कादायक निर्णय
स्वाती त्यांची पुतणी होती. कधी कधी ती त्याच्या घरी येऊन राहायची. दोघांमध्ये हळूहळू प्रेमसंबंध निर्माण झाले. पण, समाजाने त्यांच्या नात्याला मान्यता दिली नाही. त्यामुळे रेल्वेखाली जीव देण्याचा निर्णय दोघांनी घेतला.
प्रियका हिला भेटण्यासाठी जितेंद्र गोंदियाला गेला होता. 30 ऑगस्ट रोजी ते नागपुरात परतले. स्वातीही 31 ऑगस्टला नागपुरात आली होती. 1 सप्टेंबर रोजी सकाळी दोघेही घरातून बाहेर पडले.
त्यानंतर सकाळी आठ वाजले तरी त्यांचा मोबाईल लागला नाही. जितेंद्रच्या आईला याची कल्पना नव्हती. त्यामुळे तिने पोलिसांत हरवल्याची तक्रारही दाखल केली नाही.
पोलिसांनी केला भांडाफोड
हिंगणा पोलिसांना जितेंद्रच्या मोबाईलचा मदर बोर्ड सापडला. तांत्रिक व सायबर विभागाने मदत केली. मोबाईल फोनच्या आधारे मानकापूर परिसरात जितेंद्रच्या घराचा छडा लावला.
जितेंद्रची आई लक्ष्मी नेवारे यांना सोबत घेतले होते. मृताची ओळख पटली. ही मुलगी प्रियंका असल्याचे सांगण्यात येत आहे. तिच्या पालकांना गोंदिया येथे कळविण्यात आले. दोन्ही मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.
हे देखील वाचा, आवडले तर शेअर करा
- Truecaller Tips and Tricks | तुम्ही मोबाईलवर Truecaller वापरता का? मग ही बातमी वाचा
- Maharashtra Police : वाहनांचे फोटो काढण्यासाठी मोबाईल फोनचा वापर केल्यास वाहतूक पोलिसांवर होईल कारवाई
- Congress Voter List : काँग्रेसची मतदार यादी जाहीर झाली तर गांधी घराण्याच्या हातातून काँग्रेस निसटणार, याच भीतीने गदारोळ होतोय का?