Maharashtra Police : वाहनांचे फोटो काढण्यासाठी मोबाईल फोनचा वापर केल्यास वाहतूक पोलिसांवर होईल कारवाई

Maharashtra Police: Action will be taken against traffic police if mobile phones are used to take pictures of vehicles

Maharashtra Police Update | मुंबई : वाहतुकीचे नियम मोडल्यानंतर खासगी मोबाईलने वाहनाचे फोटो काढणे वाहतूक पोलिसांच्याचं अंगलट येणार आहे. खासगी मोबाईलद्वारे वाहनांचे फोटो काढणाऱ्या पोलिसांवर आता कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक कुलवंत के सरंगल (Kulwant Sarangal) यांनी परिपत्रकाद्वारे कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी वाहतूक पोलिस नेहमीच तत्पर असतात.

वाहतूक पोलिसांना ई-चलन मशिन दिलेले असतानाही वाहनांचे फोटो खासगी मोबाईल फोनद्वारे काढले जातात. अनेकदा नियमभंग करणाऱ्यांना कारवाई का केली जात आहे, हेही कळत नाही.

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांच्या मोबाईल फोनवर पोलिसांनी पकडल्यानंतर त्यांच्या घरी दंडात्मक चलन पाठवले जाते.

मात्र, आता नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाई करताना खासगी मोबाईलवरून त्या गाड्यांचे फोटो काढणे वाहतूक पोलिसांना महागात पडणार आहे.

Congress Voter List : काँग्रेसची मतदार यादी जाहीर झाली तर गांधी घराण्याच्या हातातून काँग्रेस निसटणार, याच भीतीने गदारोळ होतोय का?

या संदर्भात परिवहन विभागाने नवीन नियमावली जारी केली आहे. अतिरिक्त पोलीस महासंचालक कुलवंत सरंगल यांनी यासंदर्भात आदेश जारी केला आहे.

त्यामुळे यापुढे वाहनचालकांवर कारवाई करताना वाहतूक पोलिसांना ई-चलन मशिनचाच वापर करावा लागणार आहे.

आदेश काय आहे?

कारवाईदरम्यान वाहतूक पोलिसांकडून खासगी मोबाईलचा वापर केल्यास त्यांच्यावर कारवाई करावी, असे आदेश कुलवंत सरंगल यांनी दिले. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांना ई-चलानद्वारे दंड आकारला जातो.

वाहतूक पोलीस उल्लंघन करणाऱ्यांचे कार क्रमांक त्यांच्या मोबाईलमध्ये नोंदवून घेतात आणि त्यांच्या घरी दंडाचे चलन पाठवले जाते.

मात्र, आता नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाई करताना खासगी मोबाईलवरून त्या गाड्यांचे फोटो काढणे वाहतूक पोलिसांना महागात पडणार आहे.

अनेकदा वाहतूक पोलीस सिग्नलच्या शेवटी किंवा वळणाच्या कोपऱ्यावर दबा धरून बसतात. आपली गाडी पकडतात, परंतु अनेकदा आपल्याला नियम माहीत नसल्यामुळे ते नियम दाखवून पावती फाडतात.

तुमचे चलन चुकीच्या पद्धतीने जारी केले असल्यास, तुम्ही ते अनेक स्तरांवर रद्द देखील करू शकता. वाहनचालकांना दंड करताना ते स्वत:च्या खासगी मोबाईलवर वाहनाचा फोटो किंवा व्हिडिओ घेतात.

काही वेळाने तो फोटो ई-चलान मशिनमध्ये अपलोड करतात. तसेच गाडीचा पूर्ण फोटो न अपलोड करता फक्त नंबर प्लेटचा फोटो अपलोड केला जातो. त्यामुळे ते कोणते वाहन आहे हे ओळखणे कठीण होते. यापुढे कारचा संपूर्ण फोटो काढणे बंधनकारक असेल.

पोलिसांचा दावा

तथापि, ट्रॅफिक पोलिसांनी असा दावा केला की काहीवेळा ई-चलन मशीनची बॅटरी संपते आणि त्यांच्याकडे त्यांच्या वैयक्तिक मोबाइल फोनवरून फोटो क्लिक करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय राहत नाही.

त्यावर प्रतिक्रिया देताना, एडीजी सरंगल यांनी सांगितले की, ई-चलन मशीनच्या समस्येचा सामना करणाऱ्या वाहतूक पोलिसांनी नोडल अधिकारी आणि हॅन्डहेल्ड मशीनच्या सेवा प्रदात्यांशी संपर्क साधावा.

हे देखील वाचा, आवडले तर नक्की शेअर करा