Crime News : भोपाळमध्ये स्कूल बसमध्ये चालकाने 3 वर्षीय मुलीवर केलाबलात्कार

Crime News: A three-year-old girl was raped by the driver in a school bus in Bhopal

Crime News : मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ आणि झारखंडची राजधानी रांचीमध्ये दोन मुली हिंसाचाराच्या बळी ठरल्या आहेत. भोपाळमधील एका प्रसिद्ध खासगी शाळेच्या बस चालक आणि महिला मदतनीसला पोलिसांनी अटक केली आहे.

स्कूल बस चालकाने बसमध्ये एका 3 वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे आणि बसमध्ये उपस्थित असलेल्या महिला मदतनीसने हे प्रकरण लपविण्याचा प्रयत्न केला.

ही घटना भोपाळमधील एका नामांकित खासगी शाळेतील आहे. मुलगी इथे नर्सरीच्या वर्गात शिकते. कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितले की, मुलगी शाळेतून घरी आली तेव्हा मुलीच्या आईला कपडे बदलताना तिच्या प्रायव्हेट पार्टवर खुणा दिसल्या, त्यानंतर तिला धक्काच बसला.

आईने मुलीला विचारले असता मुलीने सांगितले की, स्कूल बस ड्रायव्हर प्रायव्हेट पार्टला हात लावतो. यानंतर कुटुंबीयांनी शाळा व्यवस्थापनाकडे तक्रार केली असता त्यांनी आरोप फेटाळून लावले. यानंतर कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार केली.

तक्रारीच्या आधारे पोलिसांनी पोक्सो आणि कलम 376 अंतर्गत गुन्हा दाखल करून स्कूल बस चालकाला अटक केली आहे. त्याचवेळी बसमध्ये उपस्थित असलेल्या महिला मदतनीसलाही पोलिसांनी अटक केली आहे.

महिला हेल्परला केवळ मुलांच्या सुरक्षेसाठी बसमध्ये बसवण्यात आल्याचा आरोप आहे, मात्र असे असतानाही तिने हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला.

त्यामुळे तिलाही आरोपी म्हणून अटक करण्यात आली आहे. हे प्रकरण भोपाळमधील एका नामांकित शाळेशी संबंधित असल्याने सरकार या प्रकरणावर लक्ष ठेवून आहे.

गृहमंत्री नरोत्तम मिश्रा म्हणाले, या घटनेतील दोन्ही आरोपी, बस चालक हनुमंत आणि महिला मदतनीस उर्मिला यांना अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणात शाळा व्यवस्थापनानेही पांघरूण घालण्याचा प्रयत्न केला आहे, त्यामुळे त्यांनाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात येणार आहे. दोषी आढळल्यास शाळा व्यवस्थापनावरही कारवाई केली जाईल.

चॉकलेटच्या बहाण्याने 6 वर्षाच्या मुलीवर बलात्कार

एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, झारखंडमधील रांची जिल्ह्यात सोमवारी एका 22 वर्षीय व्यक्तीने सहा वर्षांच्या मुलीवर चॉकलेटचे आमिष दाखवून बलात्कार केला.

घटनेनंतर परिसरातून पळून गेलेल्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने तीन-चार दिवसांपूर्वी मुलीचा विनयभंगही केला होता.

हे देखील वाचा