नागपूर : नोकरी देण्याचे आमिष दाखवून तरुणींची फसवणूक होत असल्याची धक्कादायक घटना नागपुरात समोर आली आहे.
कॅटरिंग आणि इव्हेंट मॅनेजमेंटच्या नावाखाली तरुणांना ओडिशात नेणाऱ्या अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळीचा नागपुरात पर्दाफाश झाला आहे.
याप्रकरणी पोलिसांनी अभिषेक पांडे आणि सोनू ठाकूर या दोन आरोपींना अटक केली आहे. धक्कादायक म्हणजे या तरुणींचा लैंगिक छळ करून त्यांना मारहाण करण्यात आल्याचे समोर आले आहे.
या टोळीने आतापर्यंत एकूण सहा मुलींचा अमली पदार्थांच्या तस्करीसाठी वापर केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
अभिषेक पांडे केटरिंग आणि कार्यक्रमांद्वारे ओडिशातून मोठ्या प्रमाणात गांजा आणि इतर अंमली पदार्थांची तस्करी करायचा.
त्यासाठी तो नागपूरहून मुलींना ओडिशात घेऊन जायचा. ओडिशातून बाहेर पडताना तो मुलींच्या बॅगमध्ये ड्रग्ज ठेवायचा आणि नागपूरसह राज्यात विकत होता.
अभिषेक पांडे आणि दत्तू खाटिक यांच्यातील वादाची ऑडिओ क्लिप मोबाईल फोनवर व्हायरल झाली आहे. त्यानंतर हे सर्व प्रकरण उघडकीस आले.