पुणे : औरंगाबाद पोलिसांनी पंजाबमधून आणलेल्या ३७ तलवारी जप्त केल्याच्या पाच दिवसांनंतर आज म्हणजेच ५ एप्रिल रोजी पिंपरी चिंचवड, पुणे येथे ९७ तलवारी आणि दोन खंजीर जप्त करण्यात आल्याची मोठी बातमी समोर येत आहे. एका अधिकाऱ्याने काल (दि.4) सोमवारी ही माहिती दिली.
याबाबत पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीत सांगितले की, या तलवारी व खंजीर दोन लाकडी पेट्यांमध्ये आढळून आल्या असून या पेट्या पंजाबमधील अमृतसर येथील उमेश सूद याने औरंगाबाद येथील अनिल होन यांच्याकडे पाठवल्या होत्या.
या दोघांविरुद्ध भारतीय दंड संहिता आणि शस्त्रास्त्र कायद्याच्या तरतुदीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.
पिंपरी चिंचवडमधील एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, “कुरिअर कंपनीतून तलवारी जप्त केल्यानंतर औरंगाबादमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्यानंतर आम्ही कुरिअर कंपन्यांना पार्सल काळजीपूर्वक तपासण्याचे निर्देश दिले. 1 एप्रिल रोजी एका कुरिअर कंपनीच्या प्रतिनिधीने तलवार आणि खंजर दोन लाकडी पेट्यांमध्ये कुरिअर केले जात असल्याची माहिती दिली.
आमच्याकडे 92 तलवारी आणि दोन खंजीर सापडल्या आहेत. या प्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील तपास केला जाईल, आणि कारवाई केली जाईल असे पोलिसांनी सांगितले.