Crime News: प्रेमप्रकरणातून तरुण-तरुणीचा गळफास, खून की आत्महत्या पोलिसापुढे तपासाचे आव्हान

38
Crime News Challenges Police to Investigate Young Couple's Love Affair as Murder or Suicide

क्राईम न्यूज : उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिथे प्रेमप्रकरणातून एका तरुण आणि तरुणीने मृत्यूला कवटाळले.

मृतदेह झाडाला लटकलेला पाहून ग्रामस्थांनी घटनास्थळी एकच गर्दी केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह खाली उतरवून पोस्टमॉर्टमसाठी पाठवले.

प्राथमिक तपासात केवळ प्रेमप्रकरणाची बाब समोर येत आहे. मात्र, पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. लवकरच या प्रकरणाचा छडा लावला जाईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

खून किंवा आत्महत्या

हे प्रकरण जिल्ह्यातील अटारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील आहे. लोधन पूर्वा गावातील जंगलात एका तरुण व युवतीचे मृतदेह झाडाला लटकलेले होते.

मृतदेह लटकलेल्या अवस्थेत ग्रामस्थांना पाहताच एकच खळबळ उडाली. काही वेळातच ही बातमी संपूर्ण परिसरात आगीसारखी पसरली.

माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह खाली उतरवून पोस्टमॉर्टमसाठी पाठवले. पोलिसांच्या प्राथमिक तपासात हे प्रकरण प्रेमप्रकरणातून असल्याचे सांगण्यात येत आहे.

तसेच कुटुंबीयांच्या नाराजीमुळे हे पाऊल उचलण्यात आले असावे असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र दोघांचीही हत्या करून मृतदेह झाडाला लटकवण्यात आल्याचेही गावकऱ्यांची कुजबुज सुरु आहे.

याबाबत स्थानिक पोलीस अद्याप काहीही बोलण्यास तयार नाहीत. मिळालेल्या माहितीनुसार, स्टेशन प्रभारी आता पोस्टमार्टम रिपोर्ट येण्याची वाट पहात आहेत.

तसेच ही घटना आत्महत्या मानली जात आहे. मात्र दोघांचा खून झाल्याचा गावकऱ्यांमध्ये चर्चा आहे. यापूर्वीही अशाच झाडाला प्रेमी युगुलाचे मृतदेह लटकलेले आढळले होते.

हे देखील वाचा