Crime News | एकतर्फी प्रेमातून महाविद्यालयीन तरुणीची निर्घृण हत्या; 200 फूट ओढत नेऊन धारदार शस्त्राने चिरला गळा

Crime News brutal murder college girl out of one-sided love; Pull 200 feet slit throat sharp weapon

औरंगाबाद : औरंगाबादसह राज्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. शहरातील देवगिरी कॉलेज (Deogiri Collage) परिसरात एकतर्फी प्रेमातून खुनाची घटना घडली आहे.

प्रेमाला नकार देणाऱ्या तरुणीचा बदला करण्यासाठी त्या व्यक्तीने तिला कॉलेजपासून 200 फूट ओढून नेले. त्यानंतर त्याने तिची वार करून हत्या केली.

या घटनेनंतर देवगिरी महाविद्यालयात एकच गोंधळ उडाला असून विद्यार्थ्यांमध्ये मोठी घबराट पसरली आहे. औरंगाबादमध्ये गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी वाढत असून आजच्या घटनेने नागरिकांत संतापाची लाट उसळली आहे.

शनिवारी दुपारी घडलेली ही घटना संपूर्ण शहरात वणव्यासारखी पसरली. यामुळे विद्यार्थी आणि पालकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

याप्रकरणी मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ग्रंथी सुखप्रीत कौर प्रितपाल सिंग असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. ती बीबीएच्या पहिल्या वर्षाला होती.

अशी घडली घटना

मिळालेल्या माहितीनुसार, मृत विद्यार्थी आणि मारेकरी दोघेही शहरातील उस्मानपुरा भागातील आहेत. ते एकमेकांना ओळखत होते. तो कॉलेज कॅम्पसमध्ये एका कॅफेमध्ये बसला होता.

Crime News : हैदराबादमध्ये पुन्हा सैराट । आंतरजातीय लग्न केल्याने बहिणीच्या नवऱ्याची भरबाजारात हत्या

त्यांच्यात वादावादी झाली. त्यामुळे कॅफे चालकाने त्यांना बाहेर जाण्यास सांगितले. तेथून बाहेर पडल्यानंतर त्यांच्यात पुन्हा वाद सुरू झाला. त्यानंतर हल्लेखोराने शस्त्र काढून तिच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.

मृत विद्यार्थिनीचे महाविद्यालयीन ओळखपत्र.

मृत विद्यार्थिनीचे महाविद्यालयीन ओळखपत्र

त्यामुळे विद्यार्थिनीने सुटकेसाठी पळ काढला. तिने आरडाओरड करताच लोक तिच्या दिशेने धावले. मात्र, तोपर्यंत हल्लेखोर तिच्यापर्यंत पोहोचला आणि तिची हत्या केली.

घटना सीसीटीव्हीत कैद

एकतर्फी प्रेमप्रकरणातून झालेल्या हत्येमुळे शहरात खळबळ उडाली असून, ही घटना महाविद्यालयाच्या आवारातील काही सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

याच ठिकाणी करण्यात आली विद्यार्थिनीची हत्या.

विद्यार्थिनीची हत्या करण्यात आली ते ठिकाण

या व्हिडिओमध्ये एका तरुण विद्यार्थिनीला जबरदस्तीने ओढून नेत असल्याचे ठळकपणे दिसत आहे. तिच्या पाठीवर एक मोठी सॅक आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मुलीचा मृतदेह शोधून काढला. तेव्हा तिच्या शरीरावर धारदार शस्त्राने वार केल्याच्या खुणाही होत्या.

भीती, चिंता आणि संतप्त प्रतिक्रिया

देवगिरी महाविद्यालयाच्या आवारात घडलेल्या या घटनेचे वृत्त शहरात पसरल्याने विद्यार्थ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घडलेल्या प्रकाराबद्दल पालक वर्गातूनही संताप व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. १९ वर्षीय तरुणी बीबीएच्या प्रथम वर्षात शिकत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

शहरात हत्यांचे प्रमाण वाढले आहे

गेल्या काही दिवसांपासून शहरातील गुन्हेगारीमध्ये मोठी वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी शहरातील काही तरुणांनी एका तरुणाची निर्घृण हत्या केली होती.

21 एप्रिल 2022 रोजी औरंगाबादमध्ये एका तरुणाची बेदम मारहाण करण्यात आली होती. या क्रूर घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे.

आज बरोबर एक महिन्यानंतर औरंगाबाद दुसऱ्या हत्येने हादरले आहे. शहरातील चार दिवसांत १९ वर्षीय तरुणीची ही दुसरी हत्या आहे.

शहरातील नारेगाव येथे १९ वर्षीय तरुणीची हत्या करण्यात आली. ही घटना बुधवारी रात्री नऊच्या सुमारास नारेगाव परिसरातील राजेंद्रनगरमध्ये उघडकीस आली.

रेणुका देविदास ढेपे असे मृत महिलेचे नाव आहे, अशी माहिती सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक विठ्ठल पोटे यांनी दिली. या प्रकरणातील संशयिताने आत्महत्या केली आहे.

Also Read